IPL 2021 : आई गं...! निराश होऊन डिविलियर्सच्या लेकाची करामत; त्यालाच पडली महागात

मुलाच्या चेहऱ्यावरील निराश भाव स्पष्टपणे पाहण्याजोगे होते.   

Updated: Sep 27, 2021, 12:25 PM IST
IPL 2021 : आई गं...!  निराश होऊन डिविलियर्सच्या लेकाची करामत; त्यालाच पडली महागात
छाया सौजन्य- सोशल मीडिया

IPL 2021 : आरसीबीच्या संघानं रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा 54 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान, एक असा प्रसंग आला जेव्हा प्रत्येक क्रीडारसिकाची उत्कंठा वाढली होती. यामध्ये फलंदाजीदरम्यान, आरसीबीचा दमदार खेळाडू ए बी डिविलियर्स यानं 6 चेंडूंमध्ये 11 धावा केल्या. तो बाद होताच मैदानात एकच शांतता पसरली. यावेळी त्याच्या मुलाच्या चेहऱ्यावरील निराश भाव स्पष्टपणे पाहण्याजोगे होते. 

डिविलियर्स बाद होता मुलानं काय केलं पाहा... 
बंगळुरूच्या संघाची फलंदाजी सुरु असतानाच 19 व्या षटकात बुमराहनं डिविलियर्सला बाद केलं आणि तिथे या खेळाडूच्या लेकाची निराशा झाली. त्यानं मोठ्या आवेगात हात समोरच्याच खुर्चीवर आपटला आणि मग काय, अनावधानानं त्याच्याच हाताला ती खुर्ची लागली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. 

हर्षल पटेल ठरला विजयाचा शिल्पकार 
हर्षल पटेल (4/17) आणि फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (3/11) याच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बंगळुरूच्या संघानं मुंबईला 54 धावांनी नमवलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत बंगळुरूच्या संघानं 6 गडी गमावत 165 धावा केल्या. यानंतर मैदानात आलेला मुंबईचा संघ 18.1 व्या षटकामध्ये अवघ्या 111 धावांवरच गारद झाला आणि सामना बंगळुरुच्या खिशात गेला.