Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?

Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं. 

Updated: Apr 17, 2024, 09:09 AM IST
Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर? title=

Shreyas Iyer : कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर मंगळवारी रात्री चाहत्यांचा पैसा वसूल होणारा सामना झाला. एकावेळी राजस्थान हा सामना गमावणार अशी परिस्थिती असताना बटलर टीमसाठी मात्र संकटमोचक म्हणून धावून आला. बटलरने या यंदाच्या सिझनमध्ये दुसरं शतक झळकावत टीमला देखील विजयाच्या वाटेवर आणलं. दरम्यान या सामन्यानंतर कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने मोठं विधान केलं आहे. 

IPL 2024 मध्ये KKR आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 16 एप्रिल रोजी ईडन गार्डनवर खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 6 विकेट्स गमावून 223 रन्स केले. केकेआरकडून सुनील नरीनने शतक झळकावलं. तर राजस्थानच्या वतीने जोस बटलरने 60 बॉल्समध्ये 107 रन्सची खेळी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. 

या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं. अय्यर म्हणाला, आम्ही विचारंही केला नव्हता की, परिस्थिती अशी उभी राहिल. शेवटी तो एक विचित्र खेळ होता. बटलर खूप चांगला खेळला आणि त्याला खूप चांगलं टायमिंगही देत होता. मात्र यावेळी आमच्या कडूनही काही गोलंदाजांनी चांगली खेळी केली असून मला त्यांच्यावर गर्व आहे.

सुनील नारीनचं शतक व्यर्थ

या सामन्यात केकेआरने टॉस हरला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून 223 रन्स केले. केकेआरकडून सुनील नरीनने सर्वाधिक रन्स केले. त्याने 56 बॉल्समध्ये 119 रन्सची खेळी खेळली. त्याच्याशिवाय रिंकू सिंगने 9 बॉल्समध्ये 20 रन्सची खेळी केली. तर राजस्थानकडून रियान परागने 14 बॉल्समध्ये 34 रन्स केले. अखेरीस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला 2 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

पॉईंट्स टेबलचं गणित कसं आहे?

राजस्थान रॉयल्स मोठ्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानचे आता 12 गुण झाले असून आता प्लेऑफचं गणित अगदी सोपं झालंय. तर दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स असून त्यांच्या खात्यात 8 गुण आहेत. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज देखील 8 अंक अन् 0.726 नेट रननेटसह टॉप 4 मध्ये आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ मोठ्या विजयानंतर देखील +0.502 नेट रनरेटसह 8 अंक खात्यात जमा केले आहेत.