Rohit Sharma: इंग्लंडची टीम सध्या भारताच्या दौऱ्यावर आली आहे. यावेळी इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. यावेळी पहिला सामना 25 जानेवारी पासून सुरु होणार आहे. यापूर्वी इंग्लंड टीमचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने रोहित शर्माला आऊट करण्यासाठी खास प्लॅन बनवला आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मार्क वुडने याबाबत खुलासा केला आहे.
मार्क वुड प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हणाला, मी जेव्हा मैदानात उतरेन तेव्हा तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेईन. त्या ठिकाणी बाऊंस थोडा कमी मिळू शकतो. मात्र पीचच्या दोन्ही बाजूनला गती मिळालेली दिसून आली. ज्यामुळे गोलंदाजांना नक्कीच मदत मिळणार आहे. याचं कारण म्हणजे फलंदाजांना रिस्क घेऊन शॉट खेळावे लागणार आहेत.
मार्क वुडच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मा शॉर्ट बॉलवर चांगली कामगिरी करतो. याचा अर्थ असा नाही की, मी बाऊंसर टाकणार नाही. याचा अर्थ केवळ इतकाच आहे की, मला योग्य वेळी आणि चांगल्या लांबीवर अचूक बाऊंसर टाकावे लागणार आहे. मला वाटतं की, आम्ही खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न करू. कधीकधी आपली स्थिती मजबूत करणं शहाणपणाचे असतं आणि नंतर जेव्हा संधी येते तेव्हा दबाव आणू शकतो.
पहिली टेस्ट: २५-२९ जानेवारी, हैदराबाद
दुसरी टेस्ट: २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
तिसरी टेस्ट: १५-१९ फेब्रुवारी, राजकोट
चौथी टेस्ट: २३-२७ फेब्रुवारी, रांची
5वी टेस्ट: 7-11 मार्च, धर्मशाला
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, डॅन लॉरेन्स, जॅक क्रोली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, मार्क वुड.