मुंबई: जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोना IPLमध्ये शिरला आणि सामने तात्काळ स्थगित करावे लागले. त्यापाठोपाठ श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्याआधी श्रलंकेचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आता वेस्टइंडिज संघातही कोरोना घुसला आहे.
वेस्टइंडिजच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये कोरोना घुसला आहे. 26 वर्षाच्या खेळाडूचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ट्रेनिंग कॅम्प थांबवावा लागला. याआधी श्रीलंकेच्या 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुढच्या महिन्यात कसोटी सामन्याचा सराव करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिजच्या खेळाडूंच्या कॅम्पमध्ये कोरोना घुसला आहे.
Marquino Mindley tests positive for COVID-19 | Training to start in small groups on Monday following negative repeat tests for training squad.
More below:https://t.co/Gn9kWElgFI— Windies Cricket (@windiescricket) May 23, 2021
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामने 10 जूनपासून होणार आहेत. मिंडले या खेळाडूचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ट्रेनिंग कॅम्पमध्ये RTPCR करण्यात आली. या चाचणीदरम्यान मिंडलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
मिंडलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला आयसोलेट करण्यात आलं आहे. रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्याला वेगळं राहावं लागणार आहे. तो पॉझिटिव्ह आल्यानंतर विकेंण्ड ट्रेनिंग देखील रद्द करण्यात आलं. मिंडले सोडून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.