India Vs West Indies 2nd ODI : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह वेस्ट इंडिजने वनडे सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे. कर्णधार होपने अर्धशतकी खेळी करत टीमला अखेर विजय मिळवून दिला.
वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली होती. ५३ ला पहिली विकेट गमावल्यानंतर ९१ रन्सवर चौथी विकेट गेली. अशा परिस्थितीत टीम इंडिया कमबंक करेल अशी आशा होती. मात्र कर्णधार होपने तसं होऊ दिलं नाही. होपने एका बाजूने डाव सावरत अर्धशतक झळकावलं. त्याने ८० बाॅल्समध्ये ६३ रन्सची खेळी केली. यामध्ये २ सिक्स आणि २ फोर्सचा समावेश होता.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीविना टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली नाही. अवघ्या 40.5 ओव्हर्समध्ये संपूर्ण टीम पव्हेलियनमध्ये परतली. आणि वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी १८२ रन्सचं लक्ष्य देण्यात आलं.
एके वेळ अशी होती की भारताची धावसंख्या एकही विकेटशिवाय 90 धावा होती. पण त्यानंतर 91 धावांत टीम इंडियाने10 विकेट गमावल्या. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक 55 आणि शुभमन गिलने 34 धावा केल्या. याशिवाय सूर्यकुमार यादव (24), शार्दुल ठाकूर (16) आणि रवींद्र जडेजा (10) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
दुसऱ्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याच्या खांद्यावर टीमची धुरा सोपवण्यात आली होती. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आराम देण्यात आला होता. सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या म्हणाला होता की, रोहित आणि विराट सतत क्रिकेट खेळत असून त्यांना काही काळ आराम देण्यात आला आहे.
पहिल्या वनडे सामन्याच टीम इंडियाने फलंदाजीचा क्रमवारीत प्रयोग केला होता. मात्र त्यावेळी नवख्या खेळाडूंना फारसा चांगला खेळ करता आला नाही. ११५ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाने ५ विकेट्स गमावल्या. दुसऱ्या सामन्यातंही प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाहेर ठेवण्यात आलं होतं. मात्र हा प्रयोगंही पूर्णपणे फसला आणि या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.