वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचं नाव बदललं

वेस्टइंडीज क्रिकेट टीमचं नाव बदलण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला ९१ वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त त्यांनी संघाचं नाव बदललं आहे.

Updated: Jun 3, 2017, 10:41 AM IST
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचं नाव बदललं title=

मुंबई : वेस्टइंडीज क्रिकेट टीमचं नाव बदलण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला ९१ वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त त्यांनी संघाचं नाव बदललं आहे.

'वेस्टइंडिज क्रिकेट बोर्ड' आता 'क्रिकेट वेस्टइंडिजच्या नावाने ओळखलं जाणार आहे तर टीम इंडिज नावाने ओळखली जाणार आहे. वेस्टइंडिज बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती दिली आहे.

वेस्टइंडिज क्रिकेट टीमच्या जर्सीवर आता वेस्टइंडिज ऐवजी फक्त विंडिज असं नाव दिसणार आहे. वेस्टइंडिज क्रिकेट टीम याआधीही विंडिज नावाने प्रसिद्ध होती. वनडे किंवा टेस्टमध्ये वेस्ट इंडिजची टीम इतकी बलवान नाही दिसत जितकी ती आता टी-२० मध्ये झाली आहे.

वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाचे सीईओ जॉनी ग्रेव्सने म्हटलं की, 'सध्या आम्ही अनेकांसोबत एकत्र मिळून काम करतोय. ज्याचा उद्देश क्रिकेटचा विकास करणे आहे.'

बोर्डाचे अध्यक्ष डेव कॅमरन म्हणतात की, 'नवं नाव अधिक समावेशक आणि चांगलं वाटतं. कारण बोर्ड संघटनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या खेळाडू, क्षेत्रीय बोर्ड, स्टाफ, समर्थक, सरकार, कोच, मॅच अधिकारी आणइ स्वयंसेवकांना वेगळी ओळख देऊ इच्छितो.'