भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या पहिल्या २ टी-२० मॅचसाठी वेस्ट इंडिजने टीमची घोषणा केली आहे.

Updated: Jul 23, 2019, 04:28 PM IST
भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीमची घोषणा

मुंबई : भारताविरुद्धच्या पहिल्या २ टी-२० मॅचसाठी वेस्ट इंडिजने टीमची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजच्या टीममध्ये दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. तर क्रिस गेलला मात्र टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. कार्लोस ब्रॅथवेटकडे वेस्ट इंडिजचं कर्णधारपद कायम ठेवण्यात आलं आहे. कायरन पोलार्ड, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यांना संधी देण्यात आली आहे. आंद्रे रसेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे वर्ल्ड कपच्या शेवटच्या काही मॅच त्याला खेळता आल्या नव्हत्या.

गेलशिवाय जेसन होल्डर, डॅरेन ब्राव्हो, एशले नर्स, फॅबियन ऍलन, शाय होप, केमार रोच यांना टी-२० टीममध्ये स्थान मिळालं नाही. हे सगळे खेळाडू वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज टीमचा भाग होते.

टी-२० सीरिजची पहिली मॅच ३ ऑगस्टला आणि दुसरी मॅच ४ ऑगस्टला अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये खेळवण्यात येणार आहे. तर तिसरी आणि अखेरची मॅच ६ ऑगस्टला गयानामध्ये होईल. तिसऱ्या मॅचसाठी वेस्ट इंडिजने टीमची घोषणा केलेली नाही. या दौऱ्यात टीम इंडिया ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिजही खेळणार आहे.

पहिल्या २ टी-२० साठी वेस्ट इंडिजची टीम

कार्लोस ब्रॅथवेट (कर्णधार), जॉन कॅम्बेल, एव्हिन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलास पूरन, कायरन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नारायण, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, एंथनी ब्राम्बले, आंद्रे रसेल, कॅरे पियरे

टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी