मुंबई : दिनेश कार्तिकच्या झुंजार खेळीमुळे भारताने रविवारी बांगलादेशला निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये चार विकेटनी हरवले.
अखेरच्या क्षणी कठीण वाटणारे आव्हान दिनेश कार्तिकने पेलले आणि भारताला विजय मिळवून दिला. तो सामन्याचा खरा हिरो ठरला. अखेरच्या बॉलवर सिक्सर खेचत त्याने विजय खेचून आणला.
शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी १२ धावा हव्या होत्या. त्यावेळी क्रीजवर कार्तिक आणि शंकर खेळत होते. तेव्हा आम्हाला एक मोठा शॉट हवा होता ज्यामुळे मॅच आमच्या कंट्रोलमध्ये येईल. त्यामुळे मी शंकरला म्हटले बाऊंड्री मारण्याचा प्रयत्न कर. यामुळे रनरेट कमी होईल आणि बांगलादेशवर दबाव वाढेल.
पहिल्यांदा शंकरने चौका मारला. त्यानंतर एक धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईक माझ्याकडे आला. माझ्याकडे जो बॉल आला तो परफेक्ट यॉर्कर होता. त्यामुळे एकच धाव घेता आली. त्यानंतर शंकर बाद झाला. तेव्हा मी ठरवले की मला बेस्ट शॉट खेळले पाहिजे.