14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, सामन्यापूर्वी हवामानाचे अपडेट जाणून घ्या

IND vs BAN 1st T20I:  टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर खेळणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ग्वाल्हेरला १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे.

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 6, 2024, 03:13 PM IST
 14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, सामन्यापूर्वी हवामानाचे अपडेट जाणून घ्या

India vs Bangladesh: काहीच दिवसांपूर्वी कसोटी मालिकेत 2-0 ने भारतीय टीमने बांगलादेशला पराभूत केल्यानंतर भारताची आता आजपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आहे. T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ प्रथमच आज (6 ऑक्टोबर) घरच्या मैदानावर खेळणार आहे. याशिवाय ग्वाल्हेरला १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. या दोन गोष्टींमुळे हा सामना फारच खास असणार आहे. गेल्या वेळी या शहरात आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला होता. 2010 सचिन तेंडुलकर वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता. 

Add Zee News as a Preferred Source

नव्याने बांधण्यात आले आहे स्टेडियम

ग्वाल्हेरमधील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये आजचा सामना रंगणार आहे. त्यामुळे या मैदानावर बॅट आणि बॉलचा संघर्ष बघणे मनोरंजनक ठरणार आहे. बांगलादेश त्यांच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या निवृत्तीनंतर प्रथमच कोणत्याही फॉरमॅटमध्ये मैदानात उतरणार आहे. याशिवाय या संघाकडे महमुदुल्लाह आणि मुस्तफिझूर रहमान यांचा अनुभव असेल. 

ग्वाल्हेरची खेळपट्टी

श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम या नव्या स्टेडियमवर आजपर्यंत एकही प्रथम श्रेणी सामना खेळला गेला नाही. परंतु, या वर्षी मध्य प्रदेश प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात धावांचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्यात उत्तम धावा होण्याची शक्यता आहे.

 

सामन्यापूर्वी हवामानाचे अपडेट 

या आधी कानपुर कसोटीत झालेल्या बांगलादेश आणि भारताचा सामना पावसामुळे अडीच दिवस वाया गेला. परंतु रविवारी ग्वाल्हेरमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ राहील आणि क्रिकेटसाठी अनुकूल असेल असा अंदाज आहे. 

सामन्याचे  थेट प्रक्षेपण कुठे पहावे?

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या T20I सामन्याचे थेट प्रक्षेपण Sports18 नेटवर्कवर उपलब्ध असेल. याशिवाय या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वरही  उपलब्ध असेल.

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि बांगलादेशचा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More