Who is After Sachin Virat: साल होतं 2010... वर्ल्ड कप तोंडावर असताना सर्वांच्या नजरा होत्या त्या सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याच्या कामगिरीवर. सचिनचा हा शेवटचा वर्ल्ड कप असणार हे सर्वांनाच ठाऊक होतं. त्यामुळे क्रिडाविश्वात एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे सचिन तेंडूलकरनंतर कोण? सचिनची जागा घेणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही, हे सर्वांना माहित होतं. त्यावेळी रवी शास्त्री यांनी विश्वास दाखवला तो एका युवा खेळाडूवर त्याचं नाव विराट कोहली (Virat kohli). विराट कोहली हळूहळू शतकं ठोकत गेला आणि टीम इंडियाचा प्रमुख चेहरा म्हणून त्याचं नाव समोर आलं.
सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली होणं ही सोपी गोष्ट नाही. खेळात सातत्य महत्त्वाचं असतं. सचिन विराट नंतर कोण? असा सवाल रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने भन्नाट उत्तर देखील दिलंय.
मला नक्कीच वाटतं की, शुभमन गिलमध्ये (Shubhman Gill) विराट कोहली किंवा सचिन तेंडुलकरसारखं मोठा खेळाडू बनण्याची क्षमता आहे. मला वाटतं की, शुभमन सारख्या खेळाडू टॅलेंट आहे. तो एक असाधारण खेळाडू आहे जो अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि सध्या काही असाधारण क्रिकेट खेळतोय, असं म्हणत रॉबिन उथप्पाने शुबमन गिलचं (Robin Uthappa On Shubhman Gill) कौतूक केलं आहे.
विराट कोहलीने देखील शुभमनच्या शतकानंतर त्याचं तोंडभरून कौतूक केलं. जिथं क्षमता आहे तिथं गिल आहे. आयुष्यात आणखी पुढे जा आणि पुढच्या पिढीचं नेतृत्व कर. शुभमन गिल तुला आशीर्वाद, अशी पोस्ट विराटने केली होती. पुढील पिढीचं नेतृत्व कर म्हणत विराटने (Virat Kohli On Shubhman Gill) मोठे संकेत दिले आहेत.
आणखी वाचा - IPL 2023: ना गुजरात ना मुंबई, श्रीसंत म्हणतो 'या' दोन टीम आयपीएल फायनल खेळणार!
दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत शुभमन गिलने विविध स्पर्धांमध्ये 6 शतकं ठोकली आहेत. त्यापैकी 3 शतकं वनडेमध्ये तर न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी द्विशतक देखील ठोकलं होतं. तसेच टी-20 मध्ये एक शतक देखील त्याने ठोकलंय. नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने 58 चेंडूत दमदार शतक ठोकलं आणि विराटनंतर कोण? याचं उत्तर दिलंय.