SuryaKumar Yadav: सूर्यकुमारचा गुरू कोण? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला "मला तो दररोज..."

Suryakumar yadav Guru: मेन्स टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि सूर्यकुमार यादवसह (Surya Kumar Yadav) कुलदीप यादवने (Kuldeep yadav) गप्पा मारल्या. 

Updated: Jan 30, 2023, 06:33 PM IST
SuryaKumar Yadav:  सूर्यकुमारचा गुरू कोण? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला "मला तो दररोज..." title=
Suryakumar yadav

SuryaKumar Yadav : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात कमी धावांचा पाठलाग करताना भारताचा अडखळत विजय झालाय. अखेरच्या षटकात 6 धावांची गरज होती. त्यावेळी मैदानात कॅप्टन हार्दिक (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) खेळत होता. मात्र, तरी सामन्यात काय होणार? अशी धाकधूक लागून होती. मात्र, सूर्याने अखेरीस चौकार खेचला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. सूर्याने पुन्हा एकदा आपलं कर्तुत्व सिद्ध केलंय. अशातच त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Video) होताना दिसतोय. (Who is Suryakumar yadav Guru Revealed with yuzi chahal and kuldeep yadav for the first time latest sports news)

मेन्स टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि सूर्यकुमार यादवसह (Surya Kumar Yadav) कुलदीप यादवने (Kuldeep yadav) गप्पा मारल्या. त्यावेळी दोघांनी कुलदीपच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यावेळी सूर्या आणि युझीमध्ये गमतीशीर बोलणं झालं. त्यावेळी युझीच्या गुललीला सूर्याने मैदानाबाहेर षटकार मारला. नेमकं काय बोलणं झालं पाहूया...

तिघांमध्ये गमतीशीर गप्पा सुरू असतात. त्यावेळी युझीने सूर्याला डिवचलं. तु माझी सर्व बॉटिंग अॅडॉप्ट केलीये. रणजी ट्रॉफीमधील रेड बॉलवाली व्हिडिओ पाहिली होती का तू?, असा सवाल युझी करतो. तु मला लास्ट टी-ट्वेंटी सिरीजमध्ये शिकवलं होतं. तेच मी करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतंय की, तू मला अजून बॅटिंग शिकव. मस्करीत घेऊ नका, हा माझा बॅटिंग कोच आहे, सर्वकाही हा मला शिकवतो, असं सूर्या म्हणतो. त्यावेळी युझी आणि कुलदीप खळखळून हसतो.

आणखी वाचा - U19 Women's T20 WC Final : अखेर भारताच्या पोरींनी करून दाखवलंच! इंग्लंडला नमवत वर्ल्डकपवर कोरलं नाव

माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. जेव्हा मी सुरूवात केली होती, तेव्हा कधी विचार केला नव्हता मी अशी कामगिरी करेल, असं युझी (Yuzvendra Chahal)  म्हणताना दिसतोय. त्यावेळी त्याने सामन्यामधील काही क्षणांवर देखील भाष्य केलं. 

पाहा Video -

दरम्यान, पहिल्या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने भारताचा 21 धावांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये भारताचा फक्त पराभव झाला नाही तर तुफानी बॅटींग करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) नावावर एका खराब रेकॉर्डची नोंद झाली. T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर्स खेळणाऱ्या पाच भारतीयांच्या यादीत सूर्याचं नाव सामील झालं आहे.