विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढे

Vinod Kambli: 3 डिसेंबर रोजी विनोद कांबळी त्याचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरला भेटला. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला, पण कांबळीची अवस्था पाहून सगळेच हळहळले.  

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 6, 2024, 08:03 AM IST
विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढे

Sachin Tendulkar And Vinod Kambli Meet: 3 डिसेंबर रोजी विनोद कांबळी त्याचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरची खूप वेळानंतर भेट झाली. याभेटीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. पण त्या व्हिडीओमध्ये कांबळीची अवस्था पाहून सगळ्यांचेच हळहळले. जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा सुरुवातीला काही सेकंद विनोद कांबळी मास्टर ब्लास्टर सचिनला ओळखूही शकला नाही. या भेटीमुळे सगळ्यांना प्रश्न पडला आहे की,  विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? विनोद कांबळीला काय झालं आहे? 

Add Zee News as a Preferred Source

विनोद कांबळी नाही पूर्णपणे तंदुरुस्त 

विनोद कांबळी सध्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत. कांबळीच्या निकटवर्तीय असलेल्या मार्कस कौटो यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अंपायरिंग केले आहे. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना  सांगितले की, " त्याच्या अनेक समस्या आहेत आणि पुनर्वसन केंद्रात जाण्यात काही अर्थ नाही. कांबळी यापूर्वी 14 वेळा पुनर्वसन केंद्रात गेला आहे. आम्ही त्याला तीन वेळा वसईतील पुनर्वसन केंद्रात नेले आहे." विनोद कांबळी काही काळापूर्वी अमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंजत असल्याचे समोर आले होते.

हे ही वाचा: हृदयद्रावक! ८ दिवसांवर लग्न पण काळाने घात केला; कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अचानक निधन 

बघा व्हायरल व्हिडीओ

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

 

हे ही वाचा: Junior Asia Cup: विजेतेपदाची हॅट्ट्रिक! भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास

माझी कर्णधार मदतीसाठी पुढे आले

माजी विश्वचषक चॅम्पियन कर्णधार कपिल देव यांनी काही मानसिक समस्यांशी झुंजत असलेल्या कांबळीला आर्थिक मदत करण्याचा हात पुढे केला आहे. माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंग संधू म्हणाले, " कपिल देव यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले की, जर त्यांना पुनर्वसनासाठी जायचे असेल तर आम्ही त्यांना आर्थिक मदत करण्यास तयार आहोत. उपचार कितीही वेळ चालला तरी चालेल." 

हे ही वाचा: Sachin vs Virat: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात श्रेष्ठ कोण? सुनील गावस्करांचे उत्तर एकदा ऐकाच

मित्रांपासून दुरावला विनोद कांबळी

विनोद कांबळी काही वर्षांपूर्वीपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होता. सचिनसोबतच्या ६६४ धावांच्या भागीदारीची त्याने सोशल मीडियावर अनेकदा चर्चा केली. पण त्याच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे तो त्याच्या सहकारी क्रिकेटर्सपासून दूर गेला. आता कांबळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजरी असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा बाईकसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये कांबळी लडकडत चालताना दिसत होता.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More