IND vs AUS 2nd Test Timings: भारतीय क्रिकेट संघ 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत 2-0 अशी आघाडी घेण्याच्या तयारीने ते मैदानात उतरणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताने पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 295 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्याची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती होती. नियमित कर्णधार रोहित शर्मा आता परतला आहे आणि या सामान्यापासून पुन्हा पदभार स्वीकारतआहे. पहिल्या सामन्याप्रमाणे हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू होईल, असा विचार करत असाल, तर तसे नाही. चला या सामन्याची वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह इतर महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
रोहित शर्माने सामन्याच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, केएल राहुल ॲडलेडमध्ये यशस्वी जैस्वालसोबत ओपनिंग करेल. "केएल ओपनिंग करेल. त्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि जैस्वालसोबत त्याला साथ दिली ते महत्त्वाची होती. या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मी मधल्या फळीत कुठेतरी फलंदाजी करेन."
हे ही वाचा: हृदयद्रावक! ८ दिवसांवर लग्न पण काळाने घात केला; कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अचानक निधन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर प्रसारित केला जाईल.
हे ही वाचा: Junior Asia Cup: विजेतेपदाची हॅट्ट्रिक! भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना भारतात डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, सरफराज खान, प्रसिध्द कृष्णा, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, अभिमन्यू ईश्वरन.