आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला (IND vs PAK) पाच विकेट राखून नमवलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी 20 सामन्यांनंतर हा पहिला सामना झाला. भारताने हा सामना जिंकत गेल्या वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
मात्र या भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर तिरंगा हाती न घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (jay shah) यांच्यावर निशाणा साधला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शहा यांच्यावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी टीका केली. तसेच सोशल मीडियावरही अनेकांनी जय शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय घडलं?
रविवार, 28 ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान जय शाह स्टँडमध्ये दिसले. सामन्यादरम्यान कॅमेरा वारंवार त्याच्यावर फोकस करत होता. जवळपास प्रत्येक चौकार आणि षटकारावर त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. भारताने हा सामना जिंकल्यानंतर जवळपास प्रत्येक भारतीयाने हा विजय साजरा केला.
यावेळी स्टँडवरमधेही उत्साहाचे वातावरण होते आणि त्याच सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये जय शाह टाळ्या वाजवताना दिसत आहे. यादरम्यान एक व्यक्ती हातात तिरंगा उंचावून त्याला काहीतरी बोलताना दिसत आहे. ही व्यक्ती आणि जय शाह यांच्यात काय झाले हे कोणालाच माहीत नाही. पण हा तिरंगा जय शाह यांना दिला जात असल्याचा आणि त्यांनी तो नाकारल्याचा अंदाज अनेकांनी लावला.
If it was any non bjp leader who refused to hold the Indian Flag, the whole of BJP IT Wing would have called Anti National and the Godi Media would have day long debates on it ....
Luckily its Shahenshah's Son Jay Shah pic.twitter.com/zPZStr2I3D— krishanKTRS (@krishanKTRS) August 28, 2022
मात्र जय शाह यांनी असे करून काही चुकीचे केले नाही. कारण असा कोणताही नियम किंवा कायदा नाही, जो तुम्हाला तिरंगा स्वीकारण्यास भाग पाडेल. त्यामुळेच जय शहा यांनी नियम मोडला नाही.
पण जर जय शाह यांनी तिरंगा हातात घेतला असता तर नक्कीच नियम तोडले गेले असते. जय शाह हे ICC आणि ACC मध्ये महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्यामुळे ICC च्या आचारसंहितेच्या कलम 2.2 नुसार म्हणजेच नियम क्रमांक 2.2.2.2 लॉयल्टी अंतर्गत, 'संचालक, समिती सदस्य किंवा कर्मचारी सदस्य कोणत्याही विशिष्ट भागधारक (जसे की राष्ट्रीय क्रिकेट महासंघ किंवा राष्ट्रीय क्रिकेट महासंघाचा गट) किंवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या (जसे की सरकारी किंवा राजकीय संस्था) यांच्या हिताचा प्रचार करू शकत नाहीत. असे कोणतेही कृत्य करणे आयसीसीशी संबंधित लोकांच्या विरोधात ठरेल.'
Because he is president of Asian Cricket Council. And as per code of conduct, he has to show neutrality against all stake holders. https://t.co/3SuIl2lj4i
— Facts (@BefittingFacts) August 29, 2022
त्यामुळे जय शाह यांनी तिथे तिरंगा हातात घेतला असता तर ते थेट आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन ठरले असते. कारण एकदा झेंडा उंचावला की तुम्ही एखाद्या पक्षाचे बनता आणि पक्ष बनणे हे आयसीसीच्या आचारसंहितेसह पदाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध ठरते.
मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर जय शाह यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.