शिखर धवनला गब्बर का म्हणतात? काय आहे त्याच्या नावामागचा मजेशीर किस्सा

शिखर धवनला गब्बर हे नाव कुणी आणि काय दिलं काय आहे त्याच्या नावामागचा किस्सा?

Updated: May 13, 2021, 04:52 PM IST
शिखर धवनला गब्बर का म्हणतात? काय आहे त्याच्या नावामागचा मजेशीर किस्सा title=

मुंबई: सगळ्यांचा लाडका गब्बर म्हणजे शिखर धवननं IPLमध्ये यंदा धुमाकूळ घातला. पहिल्याच काही सामन्यात ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती. मात्र शिखर धवनला टीम इंडियाकडून इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यात आली नाही. श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या दौऱ्यामध्ये शिखर धवनच्या खांद्यावर संघाचं नेतृत्व दिलं जाण्याची शक्यता आहे. शिखर धवनला सगळे जण गब्बर म्हणतात पण हे नाव कुणी दिलं आणि का हे त्याचं टोपणनाव पडलं आज जाणून घेऊया त्याच्या नावामागचा किस्सा.

रणजी ट्रॉफी दरम्यान शिखर धवननं चिअर्स करण्यासाठी शोले सिनेमातील डायलॉग डगआऊटमध्ये बसून म्हटला होता. तेव्हापासून त्याला गब्बर हे नाव पडलं. शिखर धवन मैदानात असो किंवा बाहेर बोअर झाला की त्याला मूड हलका-फुलका करण्यासाठी मजेशीर आयडिया सुचत असतात. गब्बरचे डायलॉग शिखरला खूप आवडतात. त्यामुळे त्याला नावच पुढे गब्बर असं पडलं. 

रणजीचे सामने सुरू असताना शिखरची अशीच गब्बरमधील डायलॉगवर मस्ती सुरू होती. त्यावेळी हे दिल्लीच्या रणजी टीमचा कोच विजय दाहिया यांनी ऐकलं आणि तेव्हापासून त्यांनी शिखर धवनला गब्बर हे नाव दिलं. 

 शिखर धवन नेहमी आपल्या डोक्यावर केस कमी का ठेवतो?

हा प्रश्न जेव्हा शिखरला विचारण्यात आला तेव्हाही त्याने मजेच्या मूडमध्ये शांपूचे पैसे वाचतात असं म्हणत उत्तर दिलं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान शिखर धवननं 187 धावा केल्या होत्या. त्याची कामगिरी पाहून महेंद्रसिंह धोनीनं त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी दिली होती.