Rohit Sharma: रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची टीम? 'ही' टीम खरेदी करण्याची शक्यता

IPL 2024 Auction: रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते मात्र फारच हैराण झाले आहेत. त्यानंतर रोहित शर्माला टीममधून वगळलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

सुरभि जगदीश | Updated: Dec 20, 2023, 11:20 AM IST
Rohit Sharma: रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची टीम? 'ही' टीम खरेदी करण्याची शक्यता title=

IPL 2024 Auction: आयपीएलची मिनी ऑक्शन होण्याच्या अवघ्या काही दिवस अगोदर मुंबई इंडियन्सच्या टीमने एक मोठी घोषणा केली होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला बाजूला सारून हार्दिक पंड्याच्या हाती कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. दरम्यान मॅनेजमेंटचा हा निर्णय चाहत्यांना मात्र अजिबात रूचलेला नाही. अशातच आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. 

रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते मात्र फारच हैराण झाले आहेत. त्यानंतर रोहित शर्माला टीममधून वगळलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. यानंतर रोहितची पत्नी रितिका सजदेह हिने देखील रोहित शर्मा आयपीएलमध्ये दुसऱ्या टीमकडून खेळू शकतो, असे संकेत दिले आहेत.

रोहित शर्मा दुसऱ्या टीमकडून खेळणार?

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार घोषित केल्यानंतर काही तासांनंतर दिल्ली कॅपिटल्सला रोहित शर्माला विकत घेण्याबाबत रस असल्याची बातमी समोर आली होती. डीसीचा अजेंडा सोपा असून त्यांना त्यांच्या टीमचं नेतृत्व करण्यासाठी अनुभवी व्यक्तीची आवश्यकता आहे. ऋषभ पंत आयपीएल 2024 साठी परत येऊ शकतो. परंतु टीमला कर्णधाराची गरज आहे. दिल्ली टीमला विजेतेपद मिळवू शकेल अशा कर्णधाराची गरज आहे आणि 5 वेळा विजेतेपद पटकावणारा रोहित शर्मा यासाठी योग्य आहे.

रितीका सजदेहने दिले संकेत?

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने संकेत दिले आहेत की, तो मुंबई इंडियन्स सोडून जाऊ शकतो. चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली होती. ज्यामध्ये रोहितने कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. रितिका सजदेहने सीएसकेच्या पोस्टवर कमेंट केलीये. यावेळी रितीकाने कमेंटमध्ये यल्लो हार्ट पोस्ट केलंय. या पोस्टनंतर चाहत्यांनी रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जमध्ये एन्ट्री करणार असल्याची अफवा उठलीये.

CSK ने रोहित शर्माला केलं फॉलो

चेन्नई सुपर किंग्जने रोहित शर्माला इंस्टाग्रामवर फॉलो केल्यानंतर या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणाकडूनही कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाहीये.

रोहित आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार

IPL 2013 च्या सिझनमध्ये रोहित शर्मा पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला. टूर्नामेंटच्या मध्यंतरी रिकी पाँटिंगच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आलं होतं. त्याच वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. रोहित शर्माने कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला 4 वेळा चॅम्पियन बनवलं.