Rohit Sharma च्या हातून जाणार टीम इंडियाचं कर्णधारपद?

दिग्गज क्रिकेटरचा दावा, रोहित शर्माच्या हातून जाणार टीम इंडियाची कॅप्टन्सी?

Updated: Jun 27, 2022, 05:52 PM IST
Rohit Sharma च्या हातून जाणार टीम इंडियाचं कर्णधारपद? title=

मुंबई : टीम इंडियाची सीनियर टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरी टीम B ही आयर्लंडमध्ये खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो सध्या उपचार घेत आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड एक कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली. 

आता रोहित शर्मावर माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्माला टी-20 फॉरमॅच्या कर्णधारपदावरून विश्रांती दिली जाऊ शकते असं सेहवागने म्हटलं आहे. रोहित त्याच्या कामाचा ताण अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून दुखापती आणि तणावामुळे चांगली फलंदाजी करू शकला नाही.

रोहितवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मॅनेजमेंटने तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार ठेवला तर हा पर्याय सर्वश्रेष्ठ आहे. मात्र सध्या रोहित शर्मा तणावातून जात आहे. 

विरेंद्र सेहवागच्या मते, ईशान किशन, रोहित शर्मा आणि के एल राहुल हे तिघंही आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं हे टीमसाठी हुकमी एक्के आहेत. ईशान आणि के एल राहुलची जोडी खूप चांगली आहे. उमरानलाही संधी मिळायला हवी असं त्याने आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. 

कॅप्टन रोहितची कामगिरी

विराटची 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपदावरुन पायउतार झाला. त्यानंतर रोहितला पूर्णवेळ कर्णधार म्हणून टीम इंडियाच्या टी 20 संघाची जबाबदारी देण्यात आली. टीम इंडियाने तेव्हापासून ते आतापर्यंत रोहितच्या नेतृत्वात एकही सामना गमावलेला नाही.

रोहितच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने अनुक्रमे न्यूझीलंड वेस्टइंडिज आणि श्रीलंका या तिन्ही संघावर मालिका विजय मिळवला. विशेष म्हणजे टीम इंडियाने या तिन्ही संघांना व्हाईटवॉश दिला.

इंग्लंड विरुद्धच्या 5 व्या सामन्यात मयंकला संधी

दरम्यान टीम इंडियाची सिनिअर टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी रोहितला कोरोना झाला. त्यामुळे रोहितची या। कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे कव्हर खेळाडू म्हणून मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.