IND W vs ENG W: टीम इंडियाच्या महिलांना वर्ल्डकपमध्ये पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इंग्लंड्या महिलांनी टीम इंडियाचा 11 रन्सने पराभव केला आहे. इंग्लंडने भारताला 152 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला 140 रन्सपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाच्या रिचा घोषने अखेरपर्यंत लढत दिली, मात्र टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली.
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मंधानाने लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करून दिली होती. मंधानाने 42 बॉल्समध्ये 52 रन्स केले होते. तर भारताकडून विकेटकीपर फलंदाज रिचा घोष हिने देखील शेवटपर्यंत भारताला जिंकून देण्याचा प्रयत्न केला, मात्र इंग्लंडने बाजी मारत सामना जिंकला. रिचाने 34 बॉल्समध्ये 47 रन्स केले. तर जेमिम्माने 13 रन्स केले याशिवाय कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आला नाही.
इंग्लंडची खेळाडू Nat Sciver ने उत्तम अर्धशतक झळकावलं. तिने 42 बॉल्समध्ये 50 रन्सची खेळी केली. तिला एमी जोन्सने चांगली साथ दिली. एमीने 27 बॉल्समध्ये 40 रन्स करत टीमचा स्कोर 150 च्या पुढे नेण्यास मदत केली. इंग्लंडच्या महिलांनी भारतासमोर 152 रन्सचं आव्हान ठेवलं होतं.
रेणुका सिंगने (Renuka Singh) अप्रतिम गोलंदाजी करत पहिल्या 3 षटकात 3 गडी बाद केले. तर सामन्यात तिने 5 गोलंदाजांना तंबूत पाठवले. रेणुकाने पहिल्याच षटकापासून गोलंदाजीला धडाकेबाज सुरुवात केली होती.
टीम इंडिया: शेफाली वर्मा, स्मृति मंधाना, जेमिमा रोड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (C), ऋचा घोष (WK), शिखा पांडे, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका ठाकुर सिंह
इंग्लंड: सोफिया डंकले, डेनियल याट, एलिस कैप्सी, नताली स्कीवर, हीथर नाइट (C), एमी जोन्स (WK), कैथरीन स्कीवर, सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल