Women's Day 2023 : महिला दिनानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनची मोठी घोषणा

देशात पहिल्यात महिला क्रिकेट प्रीमिअर लीगचं (Woman Premier League) आयोजन करण्यात आलं आहे. भविष्यात टीम इंडियाला (Team India) चांगल्या खेळाडू मिळावेत या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) मोठं पाऊल उचललं आहे. 

Updated: Mar 7, 2023, 09:48 PM IST
Women's Day 2023 : महिला दिनानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनची मोठी घोषणा title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई :  मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएतर्फे (MCA) महिला दिनानिमित्त (International Women's Day) यंदा पहिल्यांदाच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचं (Inter Club Women's Cricket League) आयोजन 8 मार्चपासून करण्यात येत आहे. महिला क्रिकेट लीगमध्ये 52 क्लब सहभागी झाले असून  780 महिला खेळाडूंना स्पर्धेमधून क्रिकेटचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेची सुरुवात मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध फोर्ट यंगस्टर्स या दोन संघांदरम्यानच्या सामन्यापासून होणार आहे. सलामीचा सामना महिला दिनी म्हणजे 8 मार्चला सकाळी 9 वाजता. क्रॉस मैदान (
Cross Stadium) इथं होणार आहे. 

या सामन्याला बीसीसीआयच्या (BCCI) सदस्या सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) आणि महिला टीम इंडियाची (Womens Team India) मुंबईकर खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज (Jemima Rodriguez) उपस्थित राहाणार आहेत. हा सामना महिला पंच आणि महिला गुणलेखक यांच्या नियंत्रणाखाली होईल.  

एमसीए महिला क्रिकेट लीगमध्ये 52 महिला संघ 13 गटवारीमध्ये साखळी सामन्यांसाठी विभागले आहेत. साखळी सामन्यांमधून गट-विजेता एकच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे प्रत्येक गटामधील सामने चुरशीचे होतील. नवरोज क्रिकेट क्लब वि. पी.जे. हिंदू जिमखाना, स्पोर्ट्स प्रमोशन ग्रुप मुंबई वि. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन, आवर्स क्रिकेट क्लब वि. दिलीप वेंगसरकर फौंडेशन, नॅशनल क्रिकेट क्लब वि. स्पोर्टिंग युनियन क्लब, राजावाडी क्रिकेट क्लब वि. प्रभू जॉली यंग क्रिकेटर्स, पय्याडे स्पोर्ट्स क्लब वि. माटुंगा जिमखाना, स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे वि. दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लब, ग्लोरिअस क्रिकेट क्लब वि. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, एम.आय.जी. क्रिकेट क्लब वि. वरळी स्पोर्ट्स क्लब, मुंबई पोलीस जिमखाना वि. जे. भाटीया स्पोर्ट्स क्लब इत्यादी लढती बुधवारी मुंबईतील 13 क्रिकेट खेळपट्ट्यांवर खेळवल्या जाणार आहेत.

हे ही वाचा : 'सामन्यादरम्यान रोहित शर्मा...' ईशान किशानचा गंभीर आरोप, आयपीएलच्या तोंडावर नवा वाद

मुंबईतील ऐतिहासिक अशा कांगा साखळी स्पर्धेने जसे भारताला अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले तशाच अनेक महिला क्रिकेट खेळाडू मुंबईला आणि पर्यायाने भारताला मिळावेत या हेतूने ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली आहे.