close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : शाकीबच्या अष्टपैलू कामगिरीमुळे बांगलादेशचा आणखी एक विजय

शाकीब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने आणखी एक विजय मिळवला आहे.

Updated: Jun 24, 2019, 11:39 PM IST
World Cup 2019 : शाकीबच्या अष्टपैलू कामगिरीमुळे बांगलादेशचा आणखी एक विजय

साऊथम्पटन : शाकीब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने आणखी एक विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये बांगलादेशचा ६२ रननी विजय झाला. या मॅचमध्ये शाकीब अल हसनने पहिले बॅटिंग करताना ५१ रनची खेळी केली. तर बॉलिंगमध्ये १० ओव्हरमध्ये २९ रन देऊन ५ विकेट घेतल्या. शाकीब अल हसनची वनडे क्रिकेटमधली ही सर्वोत्तम बॉलिंग आहे.

बांगलादेशने ठेवलेल्या २६३ रनचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची टीम २०० रनवर ऑल आऊट झाली. अफगाणिस्तानला बॅटिंग करताना चांगली सुरुवात मिळाली तरी नंतर मात्र त्यांच्या सातत्याने विकेट पडत होत्या. ओपनर गुलबदीन आणि रहमत शाह यांच्यात ४९ रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. समिउल्लाह शिनवारीनं अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक ४९ रनची नाबाद खेळी केली.

बांगलादेशकडून शाकिब अल हसनला ५ विकेट मिळाल्या, तर मुस्तफिजूरला २ विकेट घेण्यात यश आलं. मोहम्मद सैफुद्दीन आणि मोसाडेक हुसेनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

या मॅचमध्ये अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बांगलादेशने ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून २६२ रन केले. मुशफिकुर रहिमने सर्वाधिक ८३ रनची खेळी केली. तर शकीबने ६९ बॉलमध्ये ५१ रन केले. मोसडेक हुसेनने ३५ आणि महमदुल्लाहने २७ रन केले.

पॉईंट्स टेबलमध्ये बांगलादेशची टीम ही पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. आतापर्यंत खेळलेल्या ७ मॅचपैकी ३ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला तर ३ मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. एक मॅच पावसामुळे रद्द झाली. बांगलादेशच्या खात्यात सध्या ७ पॉईंट्स आहेत.