World Cup 2019 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक स्कोअर

वर्ल्ड कप २०१९ च्या आपल्या दुसऱ्याच सामन्यात टीम इंडियाने इतिहास घडवला आहे.

Updated: Jun 9, 2019, 07:49 PM IST
World Cup 2019 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक स्कोअर title=

लंडन : वर्ल्ड कप २०१९ च्या आपल्या दुसऱ्याच सामन्यात टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० ओव्हरमध्ये ३५२/५ एवढा स्कोअर केला. या वर्ल्ड कपमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. एवढच नाही तर टीम इंडियाचा आतापर्यंतच्या सगळ्या वर्ल्ड कपमधला ऑस्ट्रेलियाविरुद्धची सगळ्यात मोठा स्कोअर आहे.

लंडनच्या ओव्हलमध्ये झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी २२.३ ओव्हरमध्ये १२७ रनची पार्टनरशीप केली. रोहितची विकेट गेल्यानंतर शिखर धवनने विराटसोबत स्कोअर २२० रनपर्यंत पोहोचवला. शिखर धवन १०९ बॉलमध्ये ११७ रन करून आऊट झाला. हार्दिक पांड्याने २७ बॉलमध्ये ४८ रन आणि धोनीने १४ बॉलमध्ये २७ रनची खेळी केली. कर्णधार विराट कोहली ७७ बॉलमध्ये ८२ रन करून माघारी परतला. केएल राहुलने ३ बॉलमध्ये ११ रन करुन टीम इंडियाचा स्कोअर ३५०च्या पुढे पोहोचवला.

टीम इंडियाचा चौथा सर्वाधिक स्कोअर

टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधला हा चौथा सगळ्यात मोठा स्कोअर आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर २००७ साली बरमुडाविरुद्ध ४१३/५ एवढा आहे. १९९९ च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध ३७३/६ रन केले होते. २०११ साली बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाला ३७०/४ एवढा स्कोअर करता आला होता.

सर्वाधिक स्कोअर ऑस्ट्रेलियाच्या नावावर

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक स्कोअरचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. मागच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ४१७/६ एवढा स्कोअर केला होता. या यादीत टीम इंडियाचा दुसरा क्रमांक लागतो. २००७ साली टीम इंडियाने बर्मुडाविरुद्ध ४१३ रन केले होते.

p>