World Cup 2019 : विजय शंकर वर्ल्ड कपमध्ये हा विक्रम करणारा पहिला भारतीय

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमधून विजय शंकरने त्याच्या वर्ल्ड कपमधल्या मॅचमध्ये पदार्पण केलं.

Updated: Jun 16, 2019, 11:09 PM IST
World Cup 2019 : विजय शंकर वर्ल्ड कपमध्ये हा विक्रम करणारा पहिला भारतीय title=

मॅनचेस्टर : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमधून विजय शंकरने त्याच्या वर्ल्ड कपमधल्या मॅचमध्ये पदार्पण केलं. शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे विजय शंकरला या मॅचमध्ये संधी मिळाली. बॅटिंग करताना विजय शंकरला फारशी चमकदार कामगिरी करता आली नसली तरी त्याने बॉलिंग करताना विक्रमाला गवसणी घातली.

पाकिस्तानची बॅटिंग सुरु असताना ५वी ओव्हर भुवनेश्वर कुमार टाकत होता. पण मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाल्यामुळे भुवनेश्वर कुमार मैदानातून बाहेर गेला. यामुळे भुवनेश्वर कुमारची उरलेली ओव्हर विजय शंकर पूर्ण करायला आला. यानंतर पहिल्याच बॉलला विजय शंकरने इमाम उल हकला एलबीडबल्यू आऊट केलं.

वर्ल्ड कपच्या पहिल्याच बॉलला विकेट घेणारा विजय शंकर हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये याआधी ८ खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. १९९९ साली मार्क एल्हम, २००३ साली इयन हार्वे, २००७ साली जेम्स फ्रॅन्कलिन, मलाची जोन्स, मोहम्मद युसूफ, २०११ साली थिसारा परेरा आणि जेम्स नॉचे, २०१५ साली दौलत जादरानने हा विक्रम केला होता.