World Cup 2019: मुलगा नालायक, पण नातू मात्र हुशार

सोशल मीडियावर बांग्लादेशच्या विजयाचं उदाहरण देत काही क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला

Updated: Jun 18, 2019, 09:04 AM IST
World Cup 2019: मुलगा नालायक, पण नातू मात्र हुशार title=

मुंबई : 'जाएन्ट किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांग्लादेशनं आयसीसी वर्ल्डकपमध्ये (ICC World Cup 2019) धडकी मारत टूर्नामेंटला आणखीनच रोमांचकारी बनवलंय. सोमवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश मॅचदरम्यान वेस्ट इंडिजला सात विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. बांग्लादेशच्या या दमदार विजयाची प्रशंसा क्रिकेटवेड्या भारतात न झाली तरच नवल... सोशल मीडियावर बांग्लादेशच्या या विजयाचं उदाहरण देत काही क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. तर काहींनी 'मुलगा नालायक, पण नातू मात्र हुशार' असं म्हणत पाकिस्तानला टोमणे मारले. 

Bangladesh

भारतानं रविवारी पाकिस्तानला ८९ रन्सनं पछाडलं होतं. योगायोगानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला तो 'फादर्स डे'च्या दिवशी... या योगायोगाचा क्रिकेट चाहत्यांनी संगम न साधला तर तो फॅन कसला... भारत आणि पाकिस्तान मॅचसाठीही अनेक 'बाप - बेटे' उल्लेख असलेल्या जाहिरातीही टीव्ही स्क्रीनवर धडाधड आदळत होत्या. मग त्याचं उधाण आपसूकच सोशल मीडियावरही दिसून आलं. सोमवारी बांग्लादेशनं वेस्ट इंडिजला पछाडल्यानंतर भारत-पाकिस्तानच्या जाहिरात कॅम्पेननं आणखी एक पाऊल पुढे टाकलं.

Bangladesh

'बांग्लादेशची टीम श्रीलंका आणि पाकिस्तानपेक्षा चांगली आहे. आशियात भारतानंतर बांग्लादेशच टॉपची टीम आहे' असं एका यूझरनं म्हटलं. 

Bangladesh

तर एका चाहत्यानं म्हटलं, 'हॅटस ऑफ बांग्लादेश क्रिकेट टीम... कमीत कमी स्रोतांसहीत इतका चांगला आऊटपूट कुणीही देऊ शकत नाही. खरंच ते आपल्या देशासाठी प्राण पणाला लावून खेळतात'... तर आणखी एका चाहत्यानं म्हटलं 'बांग्लादेश क्रिकेट टीमचा नवा अवतार... आजपासून कुणीही बांग्लादेशला कमी समजण्याची चूक करणार नाही'.