BCCI Action Against Indian Player: टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडिया पुढील सामना आज (२९ ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने एका भारतीय क्रिकेटपटूवर बंदी घातली आहे. या क्रिकेटपटूने वेगवेगळ्या तारखांचे जन्म प्रमाणपत्र सादर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्यानंतर बीसीसीआय या खेळाडुला दोन वर्षे कोणत्याही स्पर्धेत सहभागी करुन घेणार नाही.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी जम्मू-काश्मीरमधील एका क्रिकेटपटूला एकापेक्षा अनेक जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल बंदी घातली आहे. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनने (JKCA) शनिवारी यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.
जम्मूचा क्रिकेटपटू वंशज शर्मावर वेगवेगळ्या जन्मतारीखांसह अनेक जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली आहे. या कालावधीत तो बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
'27 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यासाठी वंशराज शर्मा याच्या दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे, असे जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 2 वर्षांची बंदी पूर्ण केल्यानंतरच तो सिनीअर पुरुषांच्या बीसीसीआय स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. याशिवाय त्याला कोणत्याही वयोगटातील स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नाही, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जम्मू-काश्मीरचा क्रिकेटपटू वंशज शर्मावर वेगवेगळ्या जन्मतारीखांसह अनेक जन्म प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल दोन वर्षांची बंदी घातली आहे. वंशराज शर्माने बीसीसीआयकडे सादर केलेल्या जन्म प्रमाणपत्रात जन्मतारीख वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे 27 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणाऱ्या 2 वर्षांच्या कालावधीसाठी तो बीसीसीआयच्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
बर्याच लोकांनी वंशराज शर्माला दुसरा वंशराज शामरा समजले आहे, जो सध्या जम्मू-काश्मीर अंडर-23 संघात भाग घेत आहे. जेकेसीएच्या एका सूत्राने याबद्दल माहिती दिली. भारतीय खेळांमध्ये खेळाडूंच्या वयात फेरफार ही एक मोठी समस्या आहे. बीसीसीआयसह अनेक राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी अलीकडेच अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.