Naseer Hussain Slams Pakistan: दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड कप 2023 च्या 32 व्या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा तब्बल 190 धावांनी पराभव केला. या विजयासहीत नेट रन रेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे पाकिस्तानलाही फायदा होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामना पाकिस्तानने मोठ्या फरकाने जिंकल्याने त्यांच्या नेट रन रेटमध्ये सुधाराणा झाली असून त्यांनी पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तानी संघाच्या या कामगिरीला दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीची साथ लाभल्याने सेमीफायनल्समध्ये जाण्याच्या पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पाकिस्तानी संघ आता सेमीफायनल्समध्ये पोहचण्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. मात्र याच मुद्द्यावरुन इंग्लंडच्या एका माजी कर्णधाराने पाकिस्तानला सुनावलं आहे.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सातत्याने अपयशी ठरत असलेल्या इंग्लंडचा संघ सेमीफायनल्सच्या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडल्याचं निश्चित मानलं जात आहे. असं असतानाच आता इंग्लंडचा संघ 'हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे' मूडमध्ये असल्याचं दिसत आहे. आपण स्वत: बाहेर पडत असताना इतरांनाही घेऊन बाहेर पडण्याचा इंग्लंडच्या संघाचा मानस असून याचा पहिला फटका पाकिस्तानला बसण्याची शक्यता आहे. आपले उर्वरित सर्व सामने जिंकून सेमीफायनलसाठी पात्र ठरण्याचा बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचा प्रयत्न असणार आहे. मात्र इंग्लंडच्या संघाचे इरादे वेगळेच आहेत असं संघाचा माजी कर्णधार आणि सध्या कॉमेंट्री बॉक्समधून वर्ल्ड कप 2023 चा भाग असलेल्या नासीर हुसैनने म्हटलं आहे.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या सामन्यानंतर बोलताना नासीर हुसैनने पाकिस्तानला सुनावलं आहे. सेमीफायनल्सच्या आकडेमाडीमध्ये पाकिस्तान यंदाही इतर संघांवर अवलंबून राहणार असल्याचा मुद्दा उपस्थित करत हुसैनने नाराजी व्यक्त केली आहे. "दुसऱ्या संघांवर अवलंबून राहण्याची घाण सवय पाकिस्तानलला लागली आहे. इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या खेळावर काम केलं पाहिजे. आता त्यांचे न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धचे 2 मोठे सामने बाकी आहेत," असं हुसैन म्हणाला आहे.
नक्की वाचा >> 'विराट कोहलीप्रमाणे तो...'; शाहीद आफ्रिदीने चारचौघात बाबर आझमची लाजच काढली
इतकच नाही तर हुसैनने, "मी पैंजेवर सांगतो की इंग्लंड पाकिस्तानला पराभूत करेल. पाकिस्तानने सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावरील संघांना पराभूत केलं आहे. त्यामुळे त्यांनी फार जोशात येण्याची गरज नाही," असा टोला नासीर हुसैनने लगावला आहे.
Naseer Hussain in Commentary " Pakistan has got a habit of depending on others in every ICC tournament. Instead of depending on others, they should work on their game. They are left with 2 big games against NZ and Eng. I bet Eng will beat Pakistan. Pakistan has beaten the 7th… pic.twitter.com/wOqmwEigRl
— BALA (@rightarmleftist) November 1, 2023
बांगलादेशचा संघ अधिकृतपणे सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. तर इंग्लंडही सेमीफायलन्ससाठी पात्र ठरण्याची शक्यता अगदी 1 टक्के आहे. त्यामुळे विद्यमान विजेता असलेला इंग्लंडही जवळपास स्पर्धेतून बाहेर पडल्यात जमा असतानाच हुसैनने दिलेला हा इशारा पाकिस्तानचं टेन्शन वाढवणारा आहे हे नक्कीच.
नक्की पाहा >> Video: आक्रमक क्रिकेट खेळू म्हणजे रॉकेट लॉन्चर फेकून मारु का? पाकिस्तानी खेळाडूचा सवाल
पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यानचा सामना 11 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.