IND vs SA: लाईव्ह सामन्यात Yuzvendra Chahal कडून अंपायरला मारहाणीचा प्रयत्न? Video व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ भारतीय डावाच्या तिसऱ्या ओव्हरमधला आहे.

Updated: Oct 30, 2022, 08:51 PM IST
IND vs SA: लाईव्ह सामन्यात Yuzvendra Chahal कडून अंपायरला मारहाणीचा प्रयत्न? Video व्हायरल title=

पर्थ : युझवेंद्र चहल हा T20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. मात्र तीन सामन्यांपैकी त्याला अजून एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नाही. मात्र तरीही त्याची मजा आणि मस्करी यांच्यामुळे चहल बरेचदा चर्चेत असतो. नुकतं आजच्या झालेल्या सामन्यात असंच एक चित्र पहायला मिळालं. यावेळी मैदानात येऊन चहलने चक्क अंपायरशी मस्ती केल्याचं दिसतंय. मस्ती मस्तीमध्ये त्याने अंपायरला मुक्का मारला आहे.

T20 वर्ल्डकपचा 30 वा सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थमध्ये खेळला गेला. अटीतटीच्या या सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत 5 विकेट्सने भारतावर विजय मिळवला. मात्र यावेळी युझवेंद्र चहलचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये चहल अंपायरसोबत मस्ती करताना दिसतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ भारतीय डावाच्या तिसऱ्या ओव्हरमधला आहे. यावेळी पारनेल ओव्हरमधील पाचवा बॉल टाकत होता. याचदरम्यान फिजिओ मैदानावर आला. ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल यांनीही मैदानात पाणी आणि टॉवेल आणलं होतं. एकीकडे ऋषभ पंत टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत दिसला, तर दुसरीकडे युझवेंद्र चहल अंपायरसोबत मस्ती करताना दिसला.

या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, अंपायरशी मस्ती करत असताना युझीने अंपायरला गुडघ्याला मुक्का मारला. दरम्यान युझी मारत असतानाची ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव

 शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या मॅचमध्ये आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. भारताच्या 134 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. एडन मार्क्रम आणि डेव्हिड मिलरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने 134 धावांचा टप्पा पूर्ण केला. वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा विजयरथ आफ्रिकेने रोखला आहे.  

भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताची सुरूवात निराशाजनक झाली, आफ्रिकेच्या वेन पार्नेलने पहिलं षटक तर निर्धाव टाकलं. आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुरूवातीपासूनच दबाव केला होता. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा 15 धावा, के.एल. राहुलला 9 धावा आणि विराट कोहलीला 12 धावांवर लुंगी एनगिडीने बाद करत भारताला बॅकफूटवर ढकललं. आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 134 धावांचं आव्हान होतं.

लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचीही सुरूवात एकदम खराब झाली. अर्शदीप सिंहने (Arshadeep Singh) मोठे धक्के दिले, आफ्रिकेच्या दोन महत्वपुर्ण विकेट त्याने घेतल्या.  पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉकला बाद केले, त्यानंतर रिले रोसोला बाद केले. ओव्हरमध्ये दोन महत्वपुर्ण विकेट घेतल्या. भारत या सामन्यामध्ये मुसंडी मारणार असं वाटत होतं मात्र एडन मार्क्रम आणि डेव्हिड मिलरच्या अर्धशतकाने सामना आफ्रिकेच्या पारड्यामध्ये झुकला.