WPL MI vs UP: Mumbai Indians च्या विजयाची गाडी सुसाट...! युपीचा 8 विकेट्सने केला पराभव

 खणखणीत सिक्ससह मुंबईच्या महिलांनी विजय खेचून आणला. या विजयासह मुंबईने त्यांचा यंदाच्या लीगमधील चौथा विजय नोंदवला आहे. 

Updated: Mar 12, 2023, 11:15 PM IST
WPL MI vs UP: Mumbai Indians च्या विजयाची गाडी सुसाट...! युपीचा 8 विकेट्सने केला पराभव title=

WPL 2023, MI vs UP: महिला प्रिमीयर लीगमध्ये (WPL 2023) आज युपी वॉरियर्स विरूद्ध मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने युपीचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. खणखणीत सिक्ससह मुंबईच्या महिलांनी विजय खेचून आणला. या विजयासह मुंबईने त्यांचा यंदाच्या लीगमधील चौथा विजय नोंदवला आहे. पुन्हा एकदा कर्णधार हरनमप्रीत कौरने कॅप्टन्स इनिंग खेळून टीमला विजयाच्या वाटेवर नेलं आहे.

एलिसा हीली आणि ताहलिया मॅक्ग्रा यांची खेळी व्यर्थ

युपीच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कर्णधार एलिसा हिलीने ओपनर म्हणून टीमला चांगली सुरुवात करून दिली. एलिसाने 46 बॉल्समध्ये 58 रन्सची खेळी केली. यामध्ये 7 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे. तर ताहलिया मॅक्ग्रा हिनेही अर्धशतक झळकावलं. या दोघींच्या उत्तम खेळीने टीमचा स्कोर 150 पार होण्यास मदत झाली.

मुंबईच्या टीमला 160 रन्सचं आव्हान

युपीच्या महिलांनी 20 ओव्हर्समध्ये 159 रन्स करत मुंबईला जिंकण्यासाठी 160 रन्सचं आव्हान दिलं. या सामन्यात मुंबईकडून हीली मॅथ्यूजला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र यास्तिका भाटिया (42), नॅट सीवर-ब्रंट (45) आणि कर्णधार हरमनप्रीतने (53) उत्तम खेळी करत टीमला विजय मिळवून दिला. 

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11

यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हीली मॅथ्यूज, नताली सीवर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), धारा गुज्जर, अमेलिया केर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काजी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक

यूपी वारियर्सची प्लेईंग 11 

देविका वैद्य, एलिसा हीली (कर्णधार/विकेटकीपर), श्वेता सहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅक्ग्रा, दीप्ति शर्मा, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, शबनम इस्माइल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड