Riley Rossouw Replace Rishabh Pant: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा 30 डिसेंबरला भीषण (Car Accident) अपघात झाला होता. आगीने खाक झालेल्या गाडीमधून ऋषभ थोडक्यात बचावला. मात्र, या अपघातातून तो पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे तो आयपीएल (IPL 2023) खेळणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. ऋषभ खेळणार नसल्याने मॅनेजमेंट्च्या अडचणीत वाढ झाली होती. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) टेन्शन संपल्याचं पहायला मिळतंय. कारण ऋषभच्या तोडीस तोड खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सला सापडलाय.
आयपीएलच्या यंदाच्या (IPL 2023) हंगामाला 31 मार्चपासून सुरू होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर बरा झालेला ऋषभ पंत यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार नाही. मात्र, पंतसारखा पॉवर हिटर (Power Hitter) नसल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सवर कोणताही परिणाम होऊ शकत नाही. त्याला कारण DC चा नवा 'पॉवर हिटर' रिले रुसो (Riley Rossouw)...
सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये रिले रुसोने (Riley Rossouw) धुराळा केल्याचं पहायला मिळतंय. मुळचा साऊथ अफ्रिकेचा (SA) असलेल्या रिले रुसोने नुकतंच अवघ्या 41 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं. लिलावात रिलेला दिल्ली कॅपिटल्सने 4.6 कोटींना विकत घेतलं होतं. पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावलं आहे. त्यामुळे आता दिल्लीकरांचा आनंद गगनात मावेना झालाय.
Name: Riley Rossouw
Game: Hitting the fastest 100s in the HBL PSLRECORD-HOLDER ROSSOUW#SabSitarayHumaray l #HBLPSL8 l #PZvMS @Rileerr pic.twitter.com/JJtHoomWt3
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 10, 2023
यंदाच्या पर्वामध्ये पंत खेळणार नसल्याने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नरबरोबरच संघाने उपकर्णधाराचीही घोषणा केली आहे. दिल्लीच्या संघाचं उपकर्णधारपद भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे सोपवण्यात आलंय.
1 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स vs लखनऊ सुपर जायन्ट्स
4 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टाइटन्स
8 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स
11 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियंस
15 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स vs रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
20 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाइट राइडर्स
24 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स vs सनराइजर्स हैदराबाद
29 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स vs सनराइजर्स हैदराबाद
2 मे दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टाइटन्स
6 मे दिल्ली कॅपिटल्स vs रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
10 मे दिल्ली कॅपिटल्स vs चेन्नई सुपर किंग्स
13 मे दिल्ली कॅपिटल्स vs पंजाब किंग्स
17 मे दिल्ली कॅपिटल्स vs पंजाब किंग्स
20 मे दिल्ली कॅपिटल्स vs चेन्नई सुपर किंग्स