कोहली नंबर 1, ICCटूर्नामेंटच्या सगळ्या फायनल खेळणारा ठरला एकमेव खेळाडू

महेंद्रसिंह धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील अनेक विक्रम करत आहे.

Updated: May 15, 2021, 10:20 AM IST
कोहली नंबर 1, ICCटूर्नामेंटच्या सगळ्या फायनल खेळणारा ठरला एकमेव खेळाडू title=

मुंबई:  महेंद्रसिंह धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील अनेक विक्रम करत आहे. कोहली सध्या जगातील सर्वात उत्कृष्ट फलंदाज आहे. जून महिन्यात कोहली 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध हा सामना आहे.

 या सामन्यासोबतच विराट कोहली जगातला नंबर एकचा खेळाडू ठरला आहे. ICC टूर्नामेंटच्या सगळे फायनल सामने खेळणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत कोणते कोणते सामने खेळले आहेत जाणून घेऊया.

अंडर 19 वर्ल्डकप - 2008

विराट कोहलीने आपल्या करियरमधील सर्वात पहिली ICC टूर्नामेंटचा फायनल सामना 2008 रोजी खेळला होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध हा सामना खेळून 12 धावांनी टीम इंडिय़ाचा विजय झाला होता. टीम इंडियाला वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. 

वन डे वर्ल्ड कप 2011

विराट कोहलीने दुसरी टुर्नामेंट 2011मध्ये खेळली होती. टीम इंडियाने 6 विकेट्सने श्रीलंका संघावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी कर्णधार होता. तर विराट कोहली संघाकडून ICC वन डे वर्ल्डकप 2011चा सामना खेळला होता. 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 

दोन वर्षांनंतर विराटने चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये ICCचा तिसरा अंतिम सामना खेळला. या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा 5 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. 

टी 20 वर्ल्ड कप 2014 

2013 नंतर लगेचच विराटने आयसीसीच्या टी 20 वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला होता. या वेळी 2014 टी -२० विश्वचषक फायनलमध्ये भारताने श्रीलेकाचा सामना केला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तरी या स्पर्धेत विराट सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. 

विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाचा सामना पुढील महिन्यात 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडशी होईल. हा फायनल खेळत विराट जगातील एकमेव खेळाडू बनला आहे जो आतापर्यंत आयसीसीच्या सर्व स्पर्धांचा फायनल खेळला आहे.