WWC 2022, NZW vs IW | Jhulan Goswami चा कारनामा, वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये वूमन्स टीम इंडियाला (WWC 2022) पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाचा (NZ vs IND) 62 रन्सने पराभव केला.

Updated: Mar 10, 2022, 03:00 PM IST
WWC 2022, NZW vs IW | Jhulan Goswami चा कारनामा, वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

वेलिंग्टन : महिला टीम इंडियाने (Womens Team India) वर्ल्ड कप 2022 मोहिमेची (WWC 2022) सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात कट्ट्रर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 107 धावांनी शानदार विजय मिळवत धमाकेदार सुरुवात केली. मात्र न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने टीम इंडियाचा 62 रन्सने पराभव केला. पण दुसऱ्या बाजूला झूलन गोस्वामीने (jhulan Goswami)  वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. (wwc 2022 ind vs nz team india jhulan goswami takes katey martin wicket and becomes joint highest wicket taker in womens world cup at hamilton)

झूलनने न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यात 9 ओव्हरमध्ये 41 धावा देत केटी मार्टिनची (Katey Martin) एकमेव विकेट घेतली. यासह झूलनने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या ऑस्ट्रेलियाची माजी गोलंदाज लिन फुलस्टनच्या (Lyn Fullston) विक्रमाची बरोबरी केली.

आता झूलन आणि लिन या दोघांच्या नावे वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 39 विकेट्सची नोंद झाली. झूलनला आता हा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी अवघ्या 1 विकेटची गरज आहे.

सामन्याचा धावता आढावा 

टीम इंडियाने टॉस जिंकत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने निर्धारित 50 ओव्हरमध्ये टीम इंडियाला 261 धावांचं आव्हान दिलं. मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाचा डाव 46.4 ओव्हरमध्ये 198 धावांवर आटोपला.