WWE: ब्रॉक लेसनरवर ब्रॉन स्ट्रोमॅनचा जीवघेणा हल्ला; हॉस्पिटलमध्ये दाखल

स्ट्रोमॅनने ब्रॉक लेसनरवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात लेसनर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 9, 2018, 08:45 PM IST
WWE: ब्रॉक लेसनरवर ब्रॉन स्ट्रोमॅनचा  जीवघेणा हल्ला;  हॉस्पिटलमध्ये दाखल title=
छायाचित्र सैजन्य : WWE (व्हिडिओ)

नवी दिल्ली : WWEमध्ये ब्रॉक लेसनरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. या आठवड्यातील एपीसोडमध्ये एक अत्यंत खतरनाक गोष्ट पहायला मिळाली. स्ट्रोमॅनने ब्रॉक लेसनरवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात लेसनर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

एकाच वेळी दोघांवर केला हल्ला

ब्रॉन स्ट्रोमॅनने केवळ लेसनरवरच हल्ला केला नाही. तर, त्याने केनवरही जोरदार हल्ला केला. त्याने या दोघांवर लॉकर रूममध्ये हल्ला केला. हा हल्ला इतका जबरदस्त होता की, स्ट्रोमॅनने या दोघांना खाली पाडून त्यांचावर दिव्यांसाठी उभारलेली लोखंडी भींतही पाडली.

वैद्यकीय तपासणीला केनचा नकार

या घटनेनंतर लेसनरला जोरदार दुखापत झाली. त्यामुळे त्याला रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. लेसनर हा यूनिवर्सल चॅम्पीयन आहे. लेसनरला हल्ल्याच्या ठिकाणापासूनच रूग्णवाहीकेने रूग्णालयापर्यंत नेण्यात आले. दरम्यान, केनने कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी करायला वैद्यकीय अधिकाऱ्यांना नकार दिला आहे.

पहिल्यांदा केनने केला हल्ला

सुरूवातीला लेसनर आपला अडव्होकेट पॉल हेमन याच्यासोबत रिंगमध्ये दिसला. रिंगमध्ये आल्यावर पॉलने नेहमीप्रमाणेच लेसनरचे प्रशंसा केली आणि हा सामनाही तोच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. प्रोमो संपल्यावर केन अगदी निवांतपणे रॅम्पच्या दिशेने जात होता. इतक्यात केनने त्याच्यावर हल्ला केला. दोघे एकमेकांशी लढता लढता स्टेजच्या पाठीमागे गेले. दोघांची लढाई सुरू असताना स्ट्रोमॅन तेथे पोहोचला आणि त्याने दोघांना धक्का देऊन खाली पाडले.

अन, लेसनर जायबंदी झाला

'द मॉन्सटर अमंग मॅन' नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्ट्रोमॅनने बेसावद लेसनरला अचानक घट्क पकडले आणि जोरदार एका बाजूला आपटले. त्यानंतर त्याने जवळच असलेला इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचा बॉक्स उचलला आणि ताकतीनिशी लेसनरवर फेकला. त्यानंतर तो इतके करून थांबला नाही. त्याने वीजेसाठी उभारलेल्या लोखंडी भींतीवर हूक फेकला आणि ती खाली पाडली. यात तो पुरता जायबंदी झाला.

लेसनर हॉस्पीटलमध्येच

दरम्यान, WWEने आपल्या अधिकृत वेबसाईटवर लेसनरच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली आहे. यात माहिती देतना WWEने म्हटले आहे की, लेसनरवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. रॉयल रम्बलमध्ये यूनिवर्सल चॅम्पीयनसाठी लेसनर, केन आणि स्ट्रोमॅन यांच्यात सामना होणार आहे.