बिचाऱ्या Virat चा नवा कोरा फोन हरवलाय अन् Zomato ला मस्करी सुचतीये, Kohli ट्विट करत म्हणतो...

Virat Kohli Viral Tweet : विराट (King kohli) गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतोय. टेस्ट सिरीज सुरू होण्याआधी विराट कोहलीसोबत वाईट घटना घडली.

Updated: Feb 7, 2023, 07:21 PM IST
बिचाऱ्या Virat चा नवा कोरा फोन हरवलाय अन् Zomato ला मस्करी सुचतीये, Kohli ट्विट करत म्हणतो...
Virat kohli, Zomato

Virat Kohli Lost New Phone Tweet Goes Viral : येत्या 9 तारखेपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy 2023) मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. त्यामुळे आता मालिका रंगदार होणार हे आता स्पष्ट होताना दिसतंय. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 साठी नागपुरात जोरदार सराव करत आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी कोहलीसोबत (Virat Kohli Tweet) एक दुःखद घटना घडली आहे. (Zomato Unique Reply on Viral Kohli Sad Feeling of Lost New Phone Tweet goes viral )

विराट कोहलीने स्वत: ट्विट करत याची माहिती दिली. किंग कोहलीचं हे ट्विट काही वेळातच व्हायरल झालं आणि चाहत्यांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. त्यामुळे विराट सध्या चर्चेचा विषय ठरतोय. विराट कोहलीसोबत (Virat Kohli Losing New Phone) नेमकं काय घडलं? असा सवाल आता विराटचे चाहते विचारत आहेत.

Virat Kohli सोबत नेमकं काय झालं?

अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना कोहलीने लिहिलंय की, नवीन फोन खरेदी करणं आणि तो अनबॉक्स न करता तो गमावण्यापेक्षा काहीही त्रासदायक नाही. कोणी माझा फोन पाहिला आहे का? असा सवाल विराट कोहलीने (Virat Kohli) ट्विटरवर विचारला आहे. 

Zomato ने दिला विराटला रिप्लाय

विराटच्या ट्विटला रिट्विट करत झोमॅटोने (Zomato unique reply to Virat Kohli) विराटला उत्तर दिलंय. जर तू भाभींच्या (Anushka Sharma) फोनवरून आईस्क्रीम (IceCream order) ऑर्डर केली तर तुला रिलॉक्स फिल होईल, असं झोमॅटोने यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे झोमॉटो देखील ट्रोल होताना दिसत आहे.

आणखी वाचा - वडिलांच्या निधनानं कोलमडलेला Virat Kohli जीवाच्या आकांतानं रडलाही नव्हता, भावाला वचन देत म्हणाला....

दरम्यान, विराट (King kohli) गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतोय. अनेकांच्या पोस्टला विराटने लाईक (Virat Kohli Post) देखील केलंय. त्यानंतर आता विराटचं ट्विट व्हायरल होताना दिसत आहे. विराटच्या ट्विटला अनेकांनी भन्नाट रिप्लाय दिले आहेत.