अंत्यसंस्कार

नेल्सन मंडेला श्रद्धांजली: दक्षिण आफ्रिकेत १० दिवस शोकसभा

दक्षिण आफ्रिकेतील महात्मा म्हणून समजले जाणारे नेल्सन मंडेला यांच्यावर १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंत्यसंस्काराची तयारी ही शनिवारीच सुरु करण्यात आली आहे. तसंच त्यांची शोकसभा १० दिवस चालणार आहे. या शोकसभेत जगभरातून असंख्य लोक आणि नेते मंडळी येण्याची शक्यता आहे. जोहान्सबर्ग या ९५,००० सीटची क्षमता असलेल्या स्टेडियमवर मंगळवारी मंडेला यांची शोकसभा होणार आहे. या शोकसभेत मोठ्या प्रमाणावर जनता एकत्रित येण्याची शक्यता आहे.

Dec 8, 2013, 10:52 AM IST

‘त्या’नं पेटत्या चितेत मारली उडी, भाजून मृत्यू

पूर्वीच्या काळी नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी त्याच्या पार्थिवासोबतच सती जायची, ही बाब आपल्या सगळ्यांनाच माहितीय. मात्र आज २१व्या शतकात पुण्यात एक खळबळजनक घटना घडलीय. एका अज्ञात व्यक्तीनं चक्क पेटत्या चितेत उडी मारलीय.

Dec 4, 2013, 03:57 PM IST

राजीव पाटील यांना अखेरचा निरोप!

दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या पार्थिवावर नाशकात अंत्यत शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीचं रुप पालटवणाऱ्या या अवलियाच्या जाण्यानं आज गोदाकाठही हळहळला. राजीव पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी अवघी मराठी चित्रपटसृष्टी उपस्थित होती. शिवाय नाशिकचे महापौर यतिन वाघ, खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.

Oct 1, 2013, 01:14 PM IST

राजीव पाटील यांच्यावर आज नाशकात अंत्यसंस्कार

आपल्या सगळ्या सिनेमांमधून सामाजिक भान जपणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तरूण मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्यांच्या नाशिकमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणारेय. त्यांच्या निधनामुळम सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होतेय.

Oct 1, 2013, 08:39 AM IST

दहनापूर्वी मृतांच्या तोंडावर का ठेवतात चंदन?

हिंदू संस्कृतीनुसार मृत्यूनंतर दहन करताना मुखावर चंदन ठेवून दहन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. या परंपरेमागे केवळ धार्मिक कारणच नसून शास्त्रीय कारणही आहे.

Sep 18, 2013, 05:35 PM IST

दाभोलकरांवर ‘संगम माहुली’त अंत्यसंस्कार

सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या मूळगावी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी मुक्ता हिने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

Aug 21, 2013, 09:00 AM IST

डॉ. दाभोलकरांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार

साताऱ्यामध्ये महाराष्ट्र अनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराच्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते-कार्यकर्ते यावेळी हजर राहणार आहेत. मात्र त्याआधी साधनाच्या कार्यालयात दाभोलकरांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Aug 20, 2013, 12:05 PM IST

शहीद कुंडलिक माने अनंतात विलीन

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तान सैन्यानं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव खुर्द इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aug 8, 2013, 12:00 PM IST

उत्तराखंड : रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, अंत्यसंस्कार सुरू!

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये लष्काराचं रेस्क्यू ऑपरेशन फत्ते झालंय. परंतु, पुराच्या गाळात अडकलेले शव मात्र अजूनही तिथंच फसलेले आहेत. हे शव बाहेर काढण्याचं काम आता प्रशासनाला करायचंय.

Jun 27, 2013, 04:35 PM IST

अभिनेत्री जिया खानवर अंत्यसंस्कार

अभिनेत्री जिया खान हिच्यावर आज सांताक्रुझमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तिनं सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जियाच्या अंत्यसंस्कारांना बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली.

Jun 5, 2013, 06:07 PM IST

`लव्ह ट्रँगल`ला कंटाळली होती जिया?

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. परंतू तिच्या मृत्यूचं गूढ मात्र कायम आहे. जियानं ‘लव्ह ट्रॅगल’ला कंटाळून आत्महत्या केली का? यावर पोलीस तपास करत आहेत.

Jun 5, 2013, 03:51 PM IST

प्रीतीच्या अंत्यसंस्काराला नकार!

मुंबईतल्या ऍसिड हल्ल्यात बळी पडलेल्या प्रीती राठीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Jun 3, 2013, 09:33 PM IST

बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचा खर्च ५ लाख

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारांवेळी पालिकेनं खर्च केलेल्या ५ लाख रुपयांच्या मंजुरीचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती बैठकीत येणार आहे.

May 22, 2013, 04:44 PM IST

शासकीय इतमामात सरबजीत यांच्यावर अंत्यसंस्कार

पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत सिंग यांच्यावरील अंत्यविधीं थोड्या वेळापूर्वीच पार पडला.

May 3, 2013, 02:51 PM IST

बाळासाहेबांचे समाधीस्थळ मध्यरात्रीच हटवलं

शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं समाधीस्थळ शिवसैनिकांनी हलवलं.. विधीवत पूजा करुन शिवसैनिकांनी हे समाधीस्थळ हलवत बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा पूर्ववत केली.

Dec 18, 2012, 07:49 AM IST