अमित शाह

'हार पे चर्चा'करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक

बिहारमधल्या दारूण पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलावण्यात आलीय. पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली दुपारनंतर ही बैठक होणार आहे. यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते पत्रकार परिषदही घेण्याची शक्यताय.

Nov 9, 2015, 09:19 AM IST

मुख्यमंत्र्यांनी घेतली भाजप अध्यक्षांची भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्ली गाठली. पहिल्या भेटीत त्यांना राज्यातील अनेक प्रकल्पाबाबत चर्चा केली. आज पुन्हा दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली.

Nov 6, 2015, 08:30 PM IST

'युतीचं राजकारण पुरे म्हणता, काश्मीरात युती कशी चालते' उद्धव ठाकरेंची खोचक टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. अमित शाह मुंबईत येऊन युतीचं राजकारण पुरे म्हणतात. पण तिथे काश्मीरात मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहूना पाक धार्जिण्यापक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठं आश्चर्य असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. 

Jul 23, 2015, 08:52 AM IST

'कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची' - उद्धव

कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलीय.  

Jul 12, 2015, 03:34 PM IST

शिवसेनेने अमित शाहांच्या वक्तव्याची उडवली खिल्ली

भाजप-शिवसेनेचं सत्तेशी लग्न लागलं खरं. मात्र दोघांचा संसार रडत-खडतच चाललाय. अनेक विषयांवरून दोघांमध्ये वादांची मालिका अजूनही सुरू आहे. उत्सवांचा वाद निवळला तोच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी स्वबळाची भाषा केली खरी, मात्र शिवसेनेनं या वक्तव्याची खिल्ली उडवलीय.

Jul 10, 2015, 07:08 PM IST

सेनेसोबत सत्ता स्थापनेची शाहांना खंत

शिवसेनेसोबत सत्ता स्थापल्याची खंत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

Jul 10, 2015, 10:16 AM IST

मुंबईत भाजपची बैठक, अमित शाह देणार कानपिचक्या?

भाजपाच्या महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत भाजपाच्या पश्चिम विभागाची बैठक आज मुंबईत रंगशारदा इथे सुरू झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, शाह हे अनेकांना कानपिचक्या देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Jul 9, 2015, 12:57 PM IST

ललित मोदी विजा प्रकरण, सरकार सुषमा स्वराज यांच्या पाठिशी

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना प्रवासासंदर्भातील कागदपत्र मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोपात अडकलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाठिशी सरकार उभं राहिलंय. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केली. सुषमा यांनी याप्रकरणी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलंय.

Jun 14, 2015, 04:40 PM IST