आर आर पाटील

अजितदादांनीच करावं राज्याचं नेतृत्व- आबा पाटील

राज्यांच नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं त्यांच्यात कर्तृत्व आहे, अशी स्तुती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. ते पिंपरीत बोलत होते.

Jul 22, 2012, 10:26 PM IST

आबांनी केला जकात चोरीचा खुलासा

मुंबई महापालिकेत दररोज कोट्यवधींची जकात चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जकातचोरीचं मोठं रँकेट कार्यरत असल्याची माहिती खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिलीय.

Jul 17, 2012, 01:21 PM IST

आर आर पाटलांचा लागणार कस

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला गृहमंत्री आर. आर. पाटील आज उत्तर देणार आहेत.

Jul 13, 2012, 02:55 PM IST

आबांच्या कन्येची भरारी, त्याला विरोधाची तुतारी

सांगलीतल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात घराणेशाहीचा मुद्दा पुढं आला. युवती मेळाव्याच्या निमित्तानं झळकलेल्या पोस्टर्सवर आबांची मुलगी स्मिता हीचा फोटो होता. त्यामुळं तीचं राजकीय लॉँचिंग आहे काय अशी चर्चा सुरु होती.

Jul 3, 2012, 09:17 PM IST

आबांनी केली जयंतरावांची 'आदर्श' पाठराखण

आदर्श घोटाळाप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना चौकशी आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.. मात्र या घोटाळ्यात त्यांचा हात नसल्याचं सर्टिफिकेट देत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पाठराखण केलीय. तसंच मंत्रालयातल्या आगीत घातपात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Jul 1, 2012, 10:24 AM IST

पोलिसांवर वचक 'आबां'चा की 'दादां'चा?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश येताच पोलिसांनी पिंपरी मधल्या हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी ही कारवाई सुरु केली असली तरी पोलिसांवर आर आर आबांचा वचक की अजित दादांचा ही चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

Jun 27, 2012, 10:30 PM IST

सिद्दीकी हत्या प्रकरणात तुरूंग अधीक्षक निलंबित

पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैदी मोहम्मद ऊर्फ कातील सिद्दीकी याच्या हत्याप्रकरणात येरवडा कारागृहाचे अधीक्षक एस. व्ही. खटावकर यांना निलंबित करण्यात आलंय.

Jun 8, 2012, 06:04 PM IST

आर.आर.आबा, हे वागणं बरं नव्हं !

गृहमंत्री आर. आर. पाटला यांनी जतचे पाणी तासगावला पळवल्याने जत तालुक्यात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जतच्या सहाव्या टप्यातील मुख्य कालव्याचे काम पूर्ण असून हे पाणी मध्येच वळवल्याने हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे.एक तर कायम दुष्काळी असा हा जत तालुका आहे, त्यातच जतचे पाणी पळवल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

May 10, 2012, 01:09 PM IST

दुष्काळ आबांच्या सांगलीला, पोलिसांचा पगार टांगणीला!

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला मदत म्हणून पोलीस एक दिवसाचा पगार देणार आहेत. उद्योजक, व्यापा-यांनीही मदत करावी असं आवाहन राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलं आहे. मात्र, आर. आर. आबांची संकल्पना चांगली आहे.

Apr 22, 2012, 03:02 PM IST

दुष्काळी भागात, सवलतींची बरसात

सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आल्यावर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

Apr 6, 2012, 03:11 PM IST

मुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी भागातलं भयाण वास्तव

सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आलं आहे. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण करत असताना अधिकारी मात्र बिअर बारमध्ये मौजमजा करत असल्याचा आरोप खुद्द वनमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी केलाय.

Apr 6, 2012, 01:58 PM IST

हल्ल्यानंतर केंद्राने तुणतुणे वाजवू नये- आबा

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे खापर केंद्र सरकारवर फोडलंय. विधिमंडळात नक्षलवादावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं.

Mar 29, 2012, 05:49 PM IST

सांगलीमध्ये आबांची अश्वासनं

वाळूमाफियांच्या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाया सुरु केल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे. याबाबत गृहविभाग महसूल विभागाला सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय.

Mar 14, 2012, 08:50 AM IST

'कृपा'छत्रावर छापे : आबांकडून पोलिसांची पाठराखण

गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटलयं. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं आहे.

Mar 2, 2012, 02:20 PM IST

नक्की काय! मंकी मॅन की चड्डी बनियान टोळी

मंकी मॅन आणि चड्डी बनियान टोळीच्या अफवांनी मुंबईकर पुरते दहशतीखाली आहेत आणि त्यातूनच चोर सोडून भलत्याच लोकांना मारहाणीचे प्रकारही वाढले आहेत. असे असताना नक्की काय! मंकी मॅन की चड्डी बनियान टोळी, याचीच चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्याना, मंकी मॅनच्या अफवा पसरवणारी टोळी असू शकते, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुण्यात संशय व्यक्त केला आहे. पोलीस या टोळीचा छडा लावतील असं त्यांनी गुरुवारी सांगितलं.

Mar 2, 2012, 09:08 AM IST