इंग्लंड

वेळापत्रक: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०१४

आगामी १६मार्च २०१४ पासून टी-२० वर्ल्डकपला बांग्लादेशमध्ये सुरूवात होणार आहे. तर फायनल मॅच ६ एप्रिल २०१४ला होईल. कप्तान महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपसाठी मैदानात उतरणार आहे. क्रिकेट आणि मनोरंजन असं टी-२० क्रिकेटचं ब्रीद आहे.

Mar 12, 2014, 01:30 PM IST

केवीन पीटरसनला सक्तीची निवृत्ती

इंग्लंडचा धडाकेबाज बॅट्समन आणि माजी कॅप्टन केविन पीटरसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं तडकाफडकी पीटरसनला निवृत्त केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मानहानीकारक पराभवानंतर नव्यानं संघाची बांधणी करण्याचा निर्णय इंग्लंड बोर्डानं घेतला होता. त्यावर आणि पहिली कुऱ्हाड पीटरसनवर पडली.

Feb 6, 2014, 09:49 AM IST

इंग्लंडचा कॅप्टन ‘कूक’नं मोडला सचिनचा रेकॉर्ड

इंग्लंड क्रिकेट टीमचा कॅप्टन अॅलेस्टर कूक यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात आठ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड कूकनं मोडीत काढला.

Dec 28, 2013, 11:06 PM IST

ऑस्ट्रेलियाचा अॅशेस मालिकेवर ३-० ने कब्जा

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत अॅशेस मालिकेवर कब्जा केलाय. ऑस्ट्रेलियाने २००६-२००७ नंतर पुन्हा एकदा ही मालिका आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे.

Dec 17, 2013, 12:35 PM IST

अॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत, विजयाची संधी

अॅशेस सीरिजमधील ब्रिस्बेन टेस्टमध्ये इंग्लंडला विजयासाठी तब्बल ५३७ रन्सची गरज आहे. तिस-या दिवसअखेर इंग्लंड दोन विकेट्स गमावत २४ रन्सवर खेळत होती. कॅप्टन ऍलिस्टर कूक ११ तर केविन पीटरसन तीन रन्सवर नॉट आऊट आहेत. इंग्लंडने सुरुवातीलाच झटपट दोन विकेट्स गमवल्या.

Nov 23, 2013, 06:47 PM IST

</b> अॅशेस : इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया </b> - इंग्लंडवर ऑस्ट्रेलियाची दणदणीत मात

Live Ashes : इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत

Nov 23, 2013, 12:24 PM IST

अॅशेसवर इंग्लंड टीमची ‘लघूशंका’!

अॅशेस सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळं इंग्लंड ऐतिहासिक विजयापासून वंचित राहिला आहे. इंग्लंडनं अॅशेस सीरिज ३-० नं जिंकली आहे. पण हे सगळं झाल्यावर इंग्लंड संघातील काही महाभागांनी अत्यंत हीन कृत्य केलं. कूक कंपनीच्या काही शिलेदारांनी ओव्हलच्या पीचवर लघवी करून आपल्या उन्मत्तपणाचं दर्शन घडवलं.

Aug 26, 2013, 04:58 PM IST

कांगारूंना इंग्लंडने लोळविले, मालिका खिशात

अॅशेस मालिकेत कांगारूंना इंग्लंडने धूळ चारत मालिका खिशात टाकण्याचा परक्रम केला आहे. रॉजर्स-वॉर्नर जोडीने शतकी सलामी दिल्यानंतरही वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक मार्याशसमोर (६-५०) ऑस्ट्रेलियन फलंदाज ढेपाळल्यामुळे येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने कांगारूंचा ७४ धावांनी पराभव करत ३-० अशी आघाडी घेतली.

Aug 13, 2013, 08:47 AM IST

ऑसींचे बॅड लक, मेहनतीवर `पाणी`

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेसमधील तिसरी टेस्ट पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर ड्रॉ झाली.

Aug 6, 2013, 07:38 PM IST

चक दे! हॉकीच्या चिमुरड्यांचा ऐतिहासिक विजय...

ज्युनियर भारतीय महिला हॉकी टीमने जर्मनी येथे पार पडलेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलीय.

Aug 5, 2013, 04:25 PM IST

बेकायदा कृत्य करणाऱ्यांसाठी आता ‘रिपोर्ट अब्यूज’

नेटवर्किंग साइटवर येणाऱ्या अश्लील किंवा धमकी देणाऱ्या व्यक्तीना पकडण्यासाठी आता ‘रिपोर्ट अब्यूज’ नावाचे एक बटन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा इंग्लडच्या ट्विटर कार्यालयाने केली आहे.

Aug 4, 2013, 03:14 PM IST

ब्रिटनला मिळाला नवा राजपुत्र!

इंग्लंडमध्ये राजघराण्याला नवा वारस मिळालाय. नव्या राजपुत्राचा जन्म झालाय. केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनल्यानं इंग्लंडमध्ये आनंदोत्सव साजरी होतोय.

Jul 23, 2013, 08:05 AM IST

टीम इंडियाला `तो` सामना खेळायचाच नव्हता, पण...

टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी घशात घातली, मात्र, शेवटी २०-२० ओव्हर्सचा झालेला हा अंतिम सामना टीम इंडियाला खेळायचाच नव्हता, असा खुलासा आता झालाय.

Jul 3, 2013, 04:11 PM IST

युकेला जायचंय, आधी मोजा तीन लाख!

तुम्हाला परदेश गमन करावयाचे असेल तर तुमच्या खिशात लाखो रूपये असायला पाहिजेत. कारण परदेशवारी करण्यासाठी किमान तीन लाख रूपये आधी मोजावे लागतील. युकेला जाण्यासाठी तशी अट घालण्यात आली आहे. अनामत रक्कम ठेवल्यानंतर लंडनमध्ये तुम्हाला पाय ठेवता येतील..अन्यथा नाही.

Jun 25, 2013, 01:33 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, भारत आणि पाऊस

योगायोग म्हणा किंवा काहीही... चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पोहोचला की पाऊस येतोच... आणि त्यानंतर भारताचा विजय ठरलेलाच...

Jun 24, 2013, 08:25 AM IST