उरी हल्ला

उरीच्या हल्ल्यानंतर भारताच्या समर्थनात आले जगातील देश

 उरी हल्ल्यानंतर जगातील समुदायाने भारताचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की-मून यांनी हल्ला करणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत आणण्यात येईल असे म्हटले आहे. उरी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. 

Sep 19, 2016, 10:51 PM IST

उरीच्या हल्ल्यावर अक्षय कुमारने अशी प्रतिक्रिया

 उरीमध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार याने संतापात प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय म्हटला, बस आता खूप झाले. आता यावर प्रतिबंध घातले पाहिजे. अभिनेत्याने ट्विट केले की, जाँबाजांसाठी खऱ्या दिलाने प्रार्थना, दहशतवाद थांबविण्याची गरज आहे. बस आता खूप झाले. जय हिंद! 

Sep 19, 2016, 09:27 PM IST

घरी सुरू होती लगीन घाई, फोन आला की मुलगा शहीद झाला

उत्तर काश्‍मीरमधील उरी येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात १८ जवान शहीद झाले. यात महाराष्‍ट्राच्‍या चौघांना वीरमरण आले. त्‍यापैकी एक असलेल्‍या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक (२४) यांचे दिवाळीनंतर लग्‍न होणार होते. मात्र, डोक्‍यावर अक्षता पडण्‍यापूर्वीच देशासाठी त्‍यांनी आपले बलिदान दिले.

Sep 19, 2016, 07:37 PM IST

उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एक जवान शहीद

उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेला महाराष्ट्रातला आणखी एक जवान शहीद झालाय. 

Sep 19, 2016, 05:06 PM IST

10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते

 उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात  सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी या गांवचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे शहीद झाल्याने त्याच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरलीये.  चंद्रकांत यांच्या पार्थिवाची वाट त्याची पत्नी २ लहान मिले,आई,वडील व गावकरी पाहतायत

Sep 19, 2016, 04:46 PM IST

उरी हल्ल्यानंतर जवानाची ही कविता सोशल मीडियावर होतेय व्हायरल

'अबके जंग छिडी तो कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान होगा'...एक शूर जवानाच्या तोंडी कवितेचे हे शब्द देश भक्तीची नवी उर्मी प्रत्येक भारतीयाच्या मनात जागवतात.

Sep 19, 2016, 04:07 PM IST

'माझे पती आणि 17 शहीद जवानांचा बदला हवाय'

काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 भारतीय जवानांना वीरमरण आले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर झालेला हा मोठा हल्ला आहे.

Sep 19, 2016, 03:45 PM IST

उरी हल्ल्यात विकास उईकेंना वीरमरण, नांदगाववर शोककळा

उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांना वीरमरण आलं. विकास उईके अमरावती जिल्ह्यातील नांदगावचे रहिवाशी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच नांदगाववर शोककळा पसरलीय. २७ वर्षीय विकास उईके हे २००९ मध्ये भारतीय सैन्यात भर्ती झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा भारतीय सैन्यात होते.

Sep 19, 2016, 12:58 PM IST

शहीदांमध्ये महाराष्ट्राचे तीन जवान

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे ३ जवान शहीद झाले आहेत.

Sep 19, 2016, 12:10 PM IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करणार

उरीमधल्या हल्ल्याची पाकिस्तानाला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी भारतानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करण्याची तयारी सूरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sep 19, 2016, 11:46 AM IST

भारतीय सैन्यात संतापाची लाट

पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता भारतीय लष्करात संताप आहे. भारतीय लष्करात संतापाची लाट आहे.  आता भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानला त्यांच्याच हद्दीत प्रवेश करुन, जशास तसं उत्तर देण्याची वेळ आता आहे, अशी भावना आहे.

Sep 19, 2016, 09:43 AM IST

काश्मीरमधील शहीद जवानांचा आकडा १८ वर

उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत भारताचे १८ जवान शहीद झाले आहेत. 

Sep 19, 2016, 09:04 AM IST