एसटी

एसटीमध्ये ३१ विभागांत सरळसेवा भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक (कनिष्ठ) पदाकरिता सरळसेवा भरती - घटकसंवर्ग करण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती राज्यातील ३१ विभागांत होणार आहे.

Feb 16, 2015, 08:06 AM IST

एम-इंडिकेटरवर आता एसटी

रेल्वेची माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एम - इंडिकेटरवर आता एसटी गाड्यांची माहिती आणि वेळापत्रक मिळणार आहे.

Dec 31, 2014, 01:27 PM IST

एसटी महामंडळ करणार ७ हजार पदांची भरती

नवीन वर्ष नोकरीसाठी अनकूल असल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने २०१५ची गुडन्यूज दिलेय. २०१४मध्ये गणेशोत्सवापूर्वी चालकांची भरती केलेली असतानाच आता नवीन वर्षात महामंडळाकडून आणखी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार ७ हजार चालकांची भरती केली जाण्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Dec 31, 2014, 11:18 AM IST

एसटीत होणार ४३ समुपदेशकांची भरती

पुण्यात घडलेल्या संतोष माने प्रकरणानंतर एसटी महामंडळाला जाग आली होती. त्यानंतर चालकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली. या समुपदेशकांची संख्येत वाढ करून ४३ समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Oct 24, 2014, 12:01 PM IST

सातारा-मुंबई बसला अपघात, चार ठार

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला लोवळ्याजवळ एक्स्प्रेस हायवे वर अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ३० जण जखमी असल्याची माहिती हाती आली आहे. 

Oct 3, 2014, 07:10 PM IST

महाराष्ट्राच्या एसटी पोलिसांनी थांबवल्या कर्नाटक सीमेवर

महाराष्ट्र राज्याच्या एसटी बस कर्नाटक सीमेवर पोलिसांनी थांबवल्या. अनेक बसेस उमरगा सीमा तपासणी नाक्यावर अडकून पडल्या. 

Jul 30, 2014, 10:51 AM IST

एसटीची 31 जुलैपासून भाडेवाढ

एसटीच्या प्रवासभाड्यात 31 जुलैपासून सरासरी 0.81 टक्‍क्‍यांची वाढ होणार आहे. 

Jul 27, 2014, 08:52 PM IST

एसटीची आजपासून टोलमधून मुक्ती

 राज्यातले टोलनाके आजपासून टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 44 टोलनाके बंद होणार असून, आजपासून एसटीला कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेय.

Jul 1, 2014, 08:18 AM IST

खुशखबर! कार आणि एसटी होणार टोलमुक्त?

राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणारेय. राज्यसरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

Jun 7, 2014, 11:50 AM IST

भोस्ते घाटात बस दरीत कोसळली; 30 जखमी

कणकवली-मुंबई रातराणी एसटी बसला झालेल्या अपघातामध्ये 30 जण जखमी झालेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही.

May 25, 2014, 10:08 AM IST