सातारा-मुंबई बसला अपघात, चार ठार

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला लोवळ्याजवळ एक्स्प्रेस हायवे वर अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ३० जण जखमी असल्याची माहिती हाती आली आहे. 

Updated: Oct 3, 2014, 07:18 PM IST
सातारा-मुंबई बसला अपघात, चार ठार  title=

लोणावळा : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला लोवळ्याजवळ एक्स्प्रेस हायवे वर अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ३० जण जखमी असल्याची माहिती हाती आली आहे. 

ही बस ५० फूट दरीत कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  पांगोळी जवळ हा अपघात झाला. 

सातारा-मुंबई बसला अपघात, चार ठार लोणावळा ते खंडाळ्यादरम्यान हा अपघात झाला. लोणावळ्याजवळ संरक्षक कठडा तोडून ही बस ५० फूट दरीत कोसळली. 

एक्स्प्रेस वे वरील रुग्णवाहिका घटना स्थळी दाखल झाली आहे. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. साताऱ्याहून मुंबईला ही बस जात होती. 

चालक भरधाव वेगाने चालवत होता असा आरोप बस मधील प्रवाशांनी केला आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.