कोकण

कोकणात समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन

कोकणातील रत्नागिरीत दापोली तालुक्यातल्या समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन होऊ लागलंय. त्यामुळं विक एन्डची रंगत अधिकच वाढलीये. पर्यटकांसाठी हा वेगळा अनुभव ठरतोय.

Nov 6, 2012, 10:37 AM IST

सरकारविरोधात राणेंचा कोकणात मोर्चा

माधव गाडगीळ समितीच्या शिफारशींमुळे कोकणात नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे गाडगीळ समितीच्या शिफारशींविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

Oct 30, 2012, 12:03 AM IST

कोकणातलो गणेशोत्सव

गणपतीचो उत्सव.. हा हा म्हणता कधी वरष सरता कळनाचं नाय.. खर तर ह्यो उत्सव जगाचो आसलो तरी कोकणातल्या वाडीवाडीत जा काय धुमशान व्हता ना ता काय़ सांगाचा म्हाराजा..

Sep 18, 2012, 04:38 PM IST

कोकण विभागात म्हाडाची घरे

म्हाडाच्या कोकण विभागातील रहिवाशांसाठी खुशखबर आहे. म्हाडाचे कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ येत्या तीन-चार वर्षात तब्बल साडे सात हजारापेक्षा जास्त घरे बांधणार आहे.

Aug 17, 2012, 09:55 PM IST

कोकणातील उध्वस्त कुटुंबांचा आक्रोश

तीन वर्षांपूर्वी कोकणात झालेल्या फियान वादळाच्या आठवणी आजही कोकणात ताज्या आहेत. अनेकांचे बेपत्ता झालेले नातेवाईक आजही परतलेले नाहीत. ते परत येतील या एकाच आशेनं त्यांच्या पत्नी, मुलं वाटेकडे डोळे लावून बसलेत. शासनाच्या निकषामुळे ही कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.

Aug 8, 2012, 09:15 AM IST

कोकणातला शेतकरी म्हणतोय, 'साथी हाथ बढाना...'

संगमेश्वरमधील संगद येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. सुमारे ४०० शेतकरी या एकीच्या बळावर जमीन कसताना दिसतात.

Jul 26, 2012, 10:32 AM IST

श्रावण सोमवारी गंगा स्नानाची पर्वणी

कोकणातील राजापूर येथील प्रसिद्ध गंगेचे सुमारे एक वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आगमन झाले. हा चमत्कार मानला जातो. मात्र भूकंपाचा दाखला दिला गेल्याने याबाबत चर्चा सुरू झाली. असे असले तरी गेल्या काही वर्षांचा विक्रम यावर्षी गंगा मोडण्याची शक्यता आहे. तसेच श्रावण महिन्यात गंगा राहिल्याने भाविकांना श्रावण सोमवारी गंगा स्नान करण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.

Jul 19, 2012, 05:55 PM IST

पावसाचा हाहाकार, रस्त्याला ४० फूट खोल खड्डा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीकडून भूईबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणा-या मार्गात 15 मीटर रस्ता खचलाय. हा रस्ता 40 फूट खचला आहे.

Jul 4, 2012, 08:11 PM IST

कशेडी घाट तीन दिवस बंद

मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक असणार आहे. कोकणाचं प्रवेशद्वार समजलं जाणाऱ्या कशेडी घाटातील धोकादायक दगड आणि मातीचे ढिगारे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे २५, २६ आणि २७ एप्रिलपर्यंत कशेडी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Apr 23, 2012, 09:34 AM IST

ग्लोबल कोकण अवतरलं.... मुंबईत

ग्लोबल कोकण महोत्सवाच्या रुपानं मुंबईकरांना एक अनोखी मेजवानी मिळाली. कोकणची संस्कृती, तिथले चवदार पदार्थ, गाणी, नृत्य. अशा विविधांगी गोष्टींचं कोकणी रुप याची देही याची डोळा पाहण्यासाठी गेली पाच दिवस मुंबईकरांनी गर्दी केली होती.

Apr 17, 2012, 08:53 AM IST

(होळी स्पेशल) कोकणातील शिमगा

सध्या सगळं कोकण होळीच्या उत्साहात रंगलं आहे. कोकणातला शिमगा म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कोकणात होळी साजरी करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत.

Mar 7, 2012, 03:56 PM IST

राष्ट्रवादीचा राणेंवर 'हल्लाबोल'

कोकणात नारायण राणेंनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जाहीर वस्त्रहरण केल्यानंतर बिथरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राणेंवर आज एकमुखी हल्ला चढवला. सर्वांवरच राणेंनी टीकेचे प्रहार केल्यानं राष्ट्रवादीनं आज राणेंवर हल्लाबोल केला.

Feb 1, 2012, 08:28 PM IST

राणे आज करणार राष्ट्रवादीचे वस्त्रहरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा धुमशान होणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं या दोन पक्षातला संघर्ष पुन्हा झडणार आहे.

Jan 31, 2012, 08:23 AM IST

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि इंडिका गाडीत जोरदार धडक झाली. या अपघातात इंडिका कारमधील पाच जण जागीच ठार झालेत.

Jan 22, 2012, 01:31 PM IST

पुण्यामध्ये कानडी आंबे !

पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कर्नाटकच्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. हंगामापूर्वी दोन महिने आधीच या हापूसचं आगमन झाल्यानं तो कुतुहलाचा विषय ठरला आहे.

Jan 11, 2012, 11:58 PM IST