गणेशोत्सव

अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय

Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. 

Sep 15, 2023, 11:25 AM IST

गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पा घरी आणताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. वास्तूशास्त्रानुसार बाप्पाची कशी प्रतिष्ठापना करावी, याचे काही नियम जाणून घ्या. 

 

Sep 14, 2023, 04:21 PM IST

गणेशोत्सवासाठी मावा-मिठाई घेताय? मुंबईकरांसाठी पालिकेने घेतला मोठा निर्णय

BMC Inspection On Sweet Shop: गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईतील रस्त्यावर गर्दी होत आहे. सणासुदीच्या काळात मिठाईची विक्रीदेखील जोरात सुरु असते. दरम्यान मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये यासाठी मुंबई महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Sep 14, 2023, 01:22 PM IST

दरवर्षीप्रमाणे यंदा बाप्पाला घरी आणता येणार नाही? करा 'हे' उपाय

Ganesh Chaturthi 2023 : लवकरच घरोघरी आणि मंडपात गणरायाचं आगमन होणार आहे. पण काही कारणामुळे यंदा तुम्हाला घरी बाप्पा आणता आला नाही तर. अशावेळी धर्मशास्त्रात काय नियम सांगितला आहे जाणून घ्या. 

Sep 13, 2023, 12:42 PM IST

गणपती बाप्पा मोरया! श्रीगणेशमूर्तीवर शिक्का उमटवण्याचा 'तो' निर्णय अखेर रद्द

श्रीगणेश भक्तांच्या भावना लक्षात घेऊन श्रीगणेश मूर्तींवर शिक्का न उमटविण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. तसंच श्रीगणेश मूर्तींवर शिक्का न मारण्याच्या निर्णयाची माहिती मूर्तीकारांपर्यत प्रभावीपणे पोहोचविण्याचेही  आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. 

Sep 12, 2023, 06:59 PM IST

कोणत्या सोंडेचा बाप्पा घरी आणणे शुभ? डाव्या की उजव्या? आजच जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023: तुम्ही घरी आणलेल्या गणपती बाप्पाच्या मुर्तीची सोंड कोणत्या दिशेला आहे? हे पाहीले आहे का? नसेल तर आजच पाहा. कारण याचा विधींशी संबंध असतो. 

Sep 8, 2023, 09:57 AM IST

मुंबईत खेतवाडीचा राजा गणपतीचे वाजत गाजत आगमन; देशातील सर्वात उंच मूर्ती

मुंबईतील खेतवाडीचा राजाची 45 फूट उंच मूर्तीची झलक पहायाला मिळालेय.   महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात उंच गणेश मूर्ती येथे पहायला मिळणार आहे. 

 

Sep 6, 2023, 05:28 PM IST

नांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक

Nashik Muslim Community:आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो. 

Sep 6, 2023, 09:54 AM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या! गणपती आगमन मिरवणुकांदरम्यान प्रशासन का देतंय हा इशारा?

Mumbai Ganeshotsav 2023 : रस्त्यावरून जाताना सतर्क राहा प्रशासनाचा इशारा, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण. बातमी प्रत्येकासाठी तितकीच महत्त्वाची.  

 

Aug 29, 2023, 09:32 AM IST

बाप्पा पावला! गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी

मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.  हायवेचं काम जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय.

Aug 26, 2023, 11:03 PM IST

गणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस

Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं. 

 

Aug 18, 2023, 07:42 AM IST

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी, BMC च्या निर्णयामुळं चित्र बदललं

Ganeshotsav 2023 : अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव आलेला असताना आता मंडळांमध्ये आणि घराघरांमध्ये त्यासाठी लगबग सुरु झाली आहे. प्रत्येकजण थोड्याथोडक्या पद्धतीनं का असेना या उत्सवामध्ये हातभार लावत आहे. 

 

Aug 11, 2023, 07:40 AM IST

...तर गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी वाढणार; मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्टच सांगितलं

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच आता त्यासंदर्भातील नियम, अटी आणि तत्सम गोष्टींकडे नजरा वळू लागल्या आहेत. 

 

Aug 3, 2023, 07:35 AM IST

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-गोवा हायवेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर

Mumbai Goa Highway: गणपती आणि होळी हे सण कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. मुंबईत राहणारे चाकरमानी या सणांसाठी हमखास सुट्टी घेतात. पण दरवेळेस गावी जाताना त्यांना रस्ते मार्गाचा अडसर येतो. आता कोकणवासीयांची गणपतीला गावी जाण्याची तयारी सुरु आहे. 

Jun 17, 2023, 05:01 PM IST

बातमी गणेशोत्सवाची; प्रशासनाकडून नवी नियमावली लागू, आताच पाहा आणि तयारीला लागा

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी काही महिने उरले असले तरीही आता मे महिना संपल्यानंतर मान्सून सुरु होईल आणि पाहता पाहता गणेश चित्रशाळा थाटल्या जातील. त्याआधीच प्रशासनही कामाला लागलं आहे. 

 

May 19, 2023, 07:25 AM IST