ठाणे

दहीहंडीः राज्यात दोघा गोविंदांनी प्राण गमावले

ठाणेः गोविंदा पथकात नाचत असताना चक्कर येऊन पडलेल्या एका गोविंदाचा ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. लालबागच्या साईसदन गोविंदा पथकातील राजेंद्र आंबेकर असे या गोविंदाचे नाव असून  त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर रत्नागिरीत दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाला. ननाटे येथील बबन उमासरे यांचा दहीहंडी फोडताना मृत्यू झाला. 

Aug 18, 2014, 05:58 PM IST

मुंबईत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ९४ गोविंदा जखमी

मुंबई, ठाण्यात लाखमोलाचे 'लोणी' मिळवण्यासाठी थरांवर थर रचून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतानाच या नादात आत्तापर्यंत ९४ गोविंदा जखमी झाले आहे. जखमी गोविंदावर मुंबईतील नायर, सायन आणि केईएम आणि इतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Aug 18, 2014, 03:32 PM IST

‘ब्लू प्रिंट’ ऑगस्टमध्येच सादर करु - राज ठाकरे

सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. हल्ली प्रसारमाध्यमे वॉट्स अॅणपवरुन बातम्या करतात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.

Aug 17, 2014, 06:12 PM IST

ठाण्यात स्पेनच्या पाहुण्यांचा दहीहंडी थरार

ठाण्यात स्पेनच्या पाहुण्यांचा दहीहंडी थरार

Aug 16, 2014, 08:41 AM IST

ठाण्यात अंध, अपंगांसाठी स्पेशल दहीहंडी

ठाण्यात अंध, अपंगांसाठी स्पेशल दहीहंडी 

Aug 13, 2014, 10:21 AM IST

चला निसर्ग रम्य ब्लू रूफच्या सफरीवर

मुंबईच्या रोजच्या धकाधकीत निदान एक दिवस तरी निसर्गाच्या सानिध्यात शांतीचा मिळावा, म्हणून एक ठिकाण ठाण्याच्या जवळ नावारूपाला आलं आहे. कुटूंबाला घेऊन जाण्यासाठी, लहान मुलांनाही आनंद देणारं हे ठिकाण आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडला असलेलं 'ब्लू रूफ क्लब'ची रचना हा तुम्हाला स्पेशल हॉलिडेचा आनंद देणारं ठिकाण आहे.

Aug 12, 2014, 11:22 PM IST

ठाण्यातील ‘संस्कृती’ दहीहंडीची चढाओढ कायमची बंद - सरनाईक

बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या वरच्या थरावर चढविण्यास होत असलेला वाढता विरोध आणि सरावादरम्यान झालेल्या दोन गोविंदांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'नं त्यांच्या दहीहंडीतील स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Aug 11, 2014, 02:05 PM IST

दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!

दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!

Aug 8, 2014, 02:32 PM IST

दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!

उत्सवाच्या काळात होणारं ध्वनीप्रदूषण हा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. त्याविरुद्ध आता ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवाच्या काळात ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय. त्याचं स्वागत होते आहे. 

Aug 8, 2014, 12:09 PM IST

ठाण्यातल्या तरूणीने चालत्या रिक्षातून उडी मारली

महिलांवरच्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होतेय. ठाण्यातल्या एका रिक्षाचालकाने एका २४ वर्षांच्या तरुणीला भलतीकडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणीनं चालत्या रिक्षातून उडी मारून स्वत:चा बचाव केला. पण तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. ती कोमात गेलीय. 

Aug 5, 2014, 07:53 PM IST

दिलखुलास आशा...

Aug 3, 2014, 11:54 PM IST