ठाणे

राज्यात पावसाचा तडाखा, माळीण गावावर डोंगर कोसळून ६० घरे गाडली

राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा नाशिक, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव येथील माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्याने ५० ते ६० घरे गाडली गेलीत. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तर नाशिकमध्ये पाथर्डी येथे इमारतीचा एक भाग कोसळलाय. तर माळशेज घाट आणि कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.

Jul 30, 2014, 12:10 PM IST

मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार, रेल्वे लेट

मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार सुरुच आहे. कल्याण, डोंबिवली परीसरात पावसाचा जोर जास्त आहे. दरम्यान लोकल ट्रेन उशिरानं धावतायेत. हार्बर मार्गावर १० मिनिटे तर मध्य मार्गावर ट्रेन १५ मिनीटे उशिरानं धावतायेत. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी आज उशीर होऊ शकतो.

Jul 30, 2014, 07:28 AM IST

ठाणे जिल्ह्यातले १२५ तरुण बेपत्ता? गुप्तचर यंत्रणांचं अपयश

इराकमध्ये दहशतवादी संघंटनेबरोबर मिळून घातपात घडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जवळपास १३५ मुलं गेली असल्याची माहिती समोर आलीये. या माहितीमुळं तपास यंत्रणांची झोप उडाली असून, देश भरातील मोठं मोठ्या तपास यंत्रणा या प्रकरणाचा छड़ा लावण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. 

Jul 16, 2014, 07:57 PM IST

परदेशी नोकरीच्या आमिषाने 21 तरुणांची फसवणूक, 'झी मीडिया'ची मदत

परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशिया गाठलेल्या मुंबई-ठाण्यातल्या 21 तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. 

Jul 16, 2014, 10:26 AM IST

मुंबई, ठाणेसह नवीमुंबईत जोरदार पाऊस, रेल्वे वाहतूक धीमी

 मुंबई आणि ठाण्यात काल रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावलीय. शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. तसंच रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झालाय.सकाळच्या वेळी कामावर बाहेर पडणा-यांचीही या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडालीय.मात्र या पावसातही लोकलसेवा सुरळीत असली तरी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवा 10 ते 20 मिनेट उशिराने सुरु आहे.

Jul 16, 2014, 08:21 AM IST

कल्याण- ठाण्याचे युवक इराकच्या दहशतवादी संघटनेत?

इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत कल्याणचे चार युवक आणि ठाण्याचे चार युवक सहभागी झाल्याचं वृत्त आहे. कल्याणचे हे चार युवक इसिस या दहशतवादी संघटनेकडून इराक सरकारविरोधात लढत असल्याचं वृत्त आहे. 

Jul 14, 2014, 02:52 PM IST