ठाणे

पालघर नगरपरिषदेवर मनसे कार्य़कर्ते धडकलेत

ठाणे जिल्ह्यातल्या पालघर नगरपरिषदेवर आज मनसेनं धडक मोर्चा काढून मुख्याधिका-यांना घेराव घातला. यावेळी आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय.

Dec 20, 2013, 08:51 PM IST

ठाण्यात मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

ठाणे महानगरपालिकेबाहेर मनसेनं आज आंदोलन सुरु केलंय. ‘विक्रांत’ला पैसे देऊ नका ठाण्यातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी भूमिका मनसेनं घेतलीये.

Dec 19, 2013, 01:58 PM IST

ठाण्यात शिवसेना - काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

ठाणे महानगरपालिकेच्या परीवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. परीवहन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आघाडीनं फोडलेल्या शिवसेनेच्या सदस्याचा अर्ज भरताना हा प्रकार घडलाय.

Dec 18, 2013, 08:29 PM IST

ठाण्यात चिमुरड्यावर केले शिपायाने अत्याचार

सीनिअर केजीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेच्या शिपायानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील एका इंग्रजी शाळेत उघडकीस आली आहे. या शिपायाला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.

Dec 17, 2013, 07:55 PM IST

ठाण्यात धक्कादायक प्रकार, शिपायानेच केलं विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य

एका सीनियर केजीमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यावर शाळेच्या शिपायानंच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातल्या नामवंत सरस्वती विद्यालय या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घडलाय.

Dec 17, 2013, 09:38 AM IST

ठाण्यात अश्लील चाळे करणाऱ्या ‘बॉस’ला चोप

ठाण्यामध्ये एका खासगी विमा कंपनीत काम करणाऱ्या दोन मुलींची छेड काढणाऱ्या त्यांच्या बॉसला मुलींनी आणि त्यांच्या नातलगांनी चांगलाच चोप दिलाय.

Dec 13, 2013, 05:23 PM IST

मध्य मार्ग आणि ठाणे- वाशी रेल्वेसेवा विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक दोनवेळा विस्कळीत झाली. सातत्याने मध्य मार्गावरील प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही मध्य रेल्वे काही बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसला आहे. कळवा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड त्यानंतर अंबरनाथ येथे रेल्वे रूळाला तडे गेलेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, ठाणे - वाशी दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत होती. ती पूर्वत सुरू झाली आहे.

Dec 13, 2013, 12:33 PM IST

सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात ठाणेकरांचा 'लोच्या'

ठाण्यातील परिवहन सेवा डबघाईला आली आहे. परिवहनवर जवळपास ९० कोटींचं कर्ज आहे. पण सत्ताधारी आणि पालिका प्रशासनान याकडे कानाडोळा करतंय. तर नेते मंडळींना यावरून राजकारण सुचतंय. त्यामुळे टीएमटीची सेवा बंद पडते की काय असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय.

Dec 12, 2013, 08:25 PM IST

‘रिलायन्स’वर मेहेरबानी का?

ठाण्याच्या किसन नगर भागात महापालिकेची परवानगी न घेता रस्ते खोदून रिलायन्स कंपनीकडून केबल टाकण्यात येतेय. पण रिलायन्सच्या ठेकेदारांचं काम काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी बंद पाडलं. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर याची चौकशी करून कारवाई करू, असं उत्तर पालिकेकडून देण्यात आलं.

Dec 12, 2013, 08:04 PM IST

<B> गाडी घेताय, १ नंबर हवाय? तर काढा चार लाख रूपये! </b>

‘कार परवडली, पण नंबर प्लेट नको...’ अशी सध्या अवस्था झालीय. म्हणजे सामान्य माणसाला झेन, आयटेन, मारूती किंवा इको यासारख्या मोटारगाड्या जेवढ्या किंमतीला पडतात, जवळपास तेव्हढीच किंमत आता १ नंबर प्लेटसाठी मोजावी लागतेय. आवडीच्या नंबरसाठी चार-चार लाख रूपये मोजणारे हौशी कलाकार ठाण्यात आहेत.

Dec 10, 2013, 11:01 PM IST

पप्पू कलानी दोषी, ३ डिसेंबरला सुनावणार शिक्षा

इंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानीला दोषी ठरवण्यात आलंय. कल्याण सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय.

Nov 30, 2013, 04:58 PM IST

ठाणे-तुर्भे रेल्वेवर ट्रॅफिक ब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणे-तुर्भे मार्गावर जादा लांबीचे रुळ टाकण्यासाठी आजपासून शनिवारपर्यंत दुपारी १२ ते दीड वाजण्याच्या दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. याची ठाणे नवी मुंबई प्रवाशांनी नोंद घ्यावी.

Nov 25, 2013, 09:28 AM IST

ठाण्यातील एस X 4 बारवर छापा, बारबालांसह ३१ जणांना अटक

ठाण्यात मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री बारवर छापा टाकून धांडगधिंगा घालणाऱ्या आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या कारणावरून १८ अल्पवयीन मुलींसह ५६ जणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी बारमध्ये काम करणारे सहा वेटर आणि २५ ग्राहकांना पोलिसांनी अटक केली.

Nov 21, 2013, 11:48 PM IST

ठाण्यात पुन्हा कोसळली इमारत, जीवितहानी टळली

ठाण्यातील कळवा भागात आज रात्री पुन्हा एक इमारत कोसळली. पण, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

Nov 18, 2013, 08:00 AM IST

सावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक

तेलही गेलं.. तुपही गेलं अशीच काहीशी अवस्था ठाण्यातल्या एका व्यावसायिकाची झालीय. तब्बल ७० लाखांचं त्याचं घर बनावट कागदी नोटांमध्ये विकलं गेलं.

Nov 5, 2013, 11:48 AM IST