ठाणे

ठाण्यात अज्ञातांनी बाईक्स जाळल्या, राजकारणही तापलं!

ठाण्यात वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रघुनाथनगर परिसरात सहा बाईक्स जाळल्याची घटना घडलीय. अज्ञात इसमांनी या बाईक्स पेटवून दिल्या. तसंच परिसरातील ‘आनंदस्मृती’ व्यायामशाळाही पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

Sep 30, 2013, 12:00 PM IST

मुंब्रा इमारत दुर्घटना : दोन बिल्डरांना अटक

ण्यातल्या मुंब्रा परिसरात भानु अपार्टमेंट दुर्घटनेप्रकरणी दोन बिल्डरांना अटक करण्यात आलीय. शकील शेख आणि अकील शेख अशी या बिल्डरांची नावं आहेत. दोन्ही बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sep 21, 2013, 11:53 PM IST

मुंब्र्यात चार मजली इमारत कोसळली

सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असलेल्या मुंब्रा भागात आज शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत जिवीतहानी झाल्याने वृत्त नाही.

Sep 21, 2013, 11:37 AM IST

मुंबई आणि उपनगरात पाऊस, पश्चिम- मध्य रेल्वे उशिरा

मुंबई आणि उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह रात्रभर पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.

Sep 19, 2013, 08:40 AM IST

आसाराम बापूंचा साधक बेपत्ता!

अमित चितळे गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. अमित हा आसाराम बापूंचा साधक म्हणून काम करत होता. २९ मे २०१३ रोजी अमितचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलंय. मात्र त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळं अमितच्या गायब होण्यामुळं गूढ निर्माण झालंय.

Sep 8, 2013, 01:29 PM IST

`बोगस` आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला बेड्या!

आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत अनेकांना फसवणाऱ्या बोगस अधिकाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केलीय. पोलिसी पेहरावात अनेक कार्यक्रमात तो मिरवायचा. अखेर त्याचं बिंग फुटलं आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

Sep 7, 2013, 07:35 PM IST

ठाण्यात साकारणार नवे पर्यटनस्थळ

ठाण्यात लवकरच एक नवं पर्यटनस्थळ साकारणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी ठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. घोडबंदर रोड इथल्या गायमुख खाडीजवळ बनणारं हे पर्यटन कसं असणार असेल याची उत्सुकता लागली आहे.

Sep 5, 2013, 10:16 AM IST

बिबट्यानं उडवली ठाणेकरांची झोप!

ठाण्यातल्या हिरानंदानी परिसरात रात्री अचानक बिबट्या आला. हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ठाण्यातल्या सर्वात पॉश भागातल्या हिरानंदानी इस्टेट परिसरातल्या वेलेन्टीनो या इमारतीत हा बिबट्या दिसला.

Sep 4, 2013, 09:48 AM IST

ठाण्यात विजय कुणाचा?

ठाणे महापालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी आज मतदान झालंय..त्यामध्ये एक प्रभाग मुंब्रा तर दुसरा प्रभाग कोपरी असा आहे.या निवडणुकीत मुंब्रा प्रभागातून राष्ट्रवादीला चांगले मतदान पडेल असे चित्र स्पष्ट आहे.

Sep 1, 2013, 11:54 PM IST

मनसेचे कार्यालय `दुकानं` होता कामा नये - राज

आजकाल राजकीय पक्षांची कार्यालये दुकानं झाली आहेत. मात्र, मनसेच्या कार्यालयात सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. या कार्यालयांची इतर पक्षांसारखी `दुकानं` करु नका, असा खोचक सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Aug 31, 2013, 08:44 AM IST

'आबांचं गृहमंत्रीपदासाठी क्वॉलिफिकेशन काय?'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे कार्यालयाचं उद्घाटन

Aug 30, 2013, 08:33 PM IST

अबू सालेमला ठाण्याला धाडणार?

सध्या नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद असलेला कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला लवकरच ठाण्यातील विशेष कारागृहात हलवलं जाणार आहे.

Aug 28, 2013, 08:36 AM IST

आईनेच केला पोटच्या मुलीचा शरीरविक्रीसाठी सौदा

पोटच्या मुलीचा शरीरविक्री करता सौदा करणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेला तिच्या साथीदारासह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. दरम्यान, या मुलीची सुटका करण्यात आली आहे. हा प्रकार मुंब्रा परिसरात घडला आहे.

Aug 27, 2013, 04:30 PM IST

‘क्लाईम्बथॉन’मध्ये ठाण्याच्या प्रशांतनं रचला विक्रम!

‘क्लाईम्बयॉन’ स्पर्धेत ४० गिर्यारोहकांपैंकी महाराष्ट्रातून निवड झालेल्या ठाण्यातील २० वर्षीय प्रशांत नंदीने हिमालयाला कवेत घेत ६२५० मीटर उंचीवर तिरंगा रोवला.

Aug 12, 2013, 10:35 AM IST

इंटरनेटच्या माध्यमातून तीन लाखांचा गंडा

इंटरनेटच्या माध्यमातून ओळख वाढवून लोकांना गंडा घालणा-या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 26 हजारांचा चोरीचा माल पकडण्यात आला आहे. या टोळीत 2 पुरूषांसह एका महिलेचा समावेश आहे.

Aug 9, 2013, 07:16 PM IST