तंबाखू

दिल्लीत तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी

दिल्लीमध्ये चघळण्याच्या तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

Apr 15, 2016, 04:33 PM IST

तंबाखू, गुटख्यावरील बंदी अजून एका वर्षासाठी कायम

राज्यात लागू केलेल्या तंबाखू, गुटखा खरेदी विक्रीवरील बंदी आणखी वर्षभर कायम ठेवण्यात आली आहे, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.

Jul 18, 2015, 04:01 PM IST

तंबाखू जर्दींना एसटीचा दूरूनच 'राम राम'!

तंबाखू खाणा-यांना यापुढं एसटीमध्ये नोकरी मिळणार नाहीय. कारण, एसटी कर्मचाऱ्यांची भरती करतानाच, 'मी व्यसन करणार नाही' असा बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे. 

May 29, 2015, 06:23 PM IST

तंबाखूचे ७० टक्के पोलिसांना व्यसन

पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के आहे, तसेच ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचं धक्कादायक सर्वेक्षण आहे.

May 21, 2015, 04:41 PM IST

तंबाखूविरोधात खासदार सुप्रिया सुळेंचे आंदोलन

खासदार सुप्रिया सुळे यांनी तंबाखू सेवनाच्या विरोधात राज्यभरात सामाजिक आंदोलन छेडले आहे. येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तंबाखूसेवन करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.

Apr 17, 2015, 04:14 PM IST

खबरदार! तंबाखू खाऊन थुंकल्यास करावं लागणार काम

तंबाखू मळून तंबाखूची बुक्की तोंडात कोंबून चघळणाऱ्यांना चाप बसणार आहे. खबरदार! सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणे तुम्हाला भारी पडू शकते. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशी घोषणाच सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली.

Apr 10, 2015, 09:56 AM IST

रायगडमध्ये तंबाखूमुक्तिसाठी विद्यार्थ्यांचा लढा

राज्यात तंबाखू हा विषय सध्या तंबाखूपेक्षाही जास्त चघळला जातोय . त्याचवेळी रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातील विद्यार्थी तंबाखूमुक्तिसाठी लढा देताहेत. 

Apr 9, 2015, 03:34 PM IST

तंबाखूच्या वक्तव्यावर खासदार दिलीप गांधींना दणका

तंबाखूसेवनाचे पुरस्कर्ते खासदार दिलीप गांधी यांना दणका बसलाय. तंबाखू व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना धूम्रपानाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीमधून काढून टाकण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिल्याचं समजतंय.

Apr 5, 2015, 11:40 PM IST