दिल्लीत तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी

दिल्लीमध्ये चघळण्याच्या तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

Updated: Apr 15, 2016, 04:33 PM IST
दिल्लीत तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये चघळण्याच्या तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

दिल्ली सरकारच्या अन्न सुरक्षा मंत्रालयानं एका अधिसूचनेद्वारे ही बंदी लागू केली आहे. त्यानुसार सेंटेड किंवा साधा तंबाखू, गुटखा, खैनी, खर्रा, पान मसाला किंवा अन्य प्रकारच्या तंबाखूची खरेदी-विक्री, साठवणूक आणि यातायात करण्यावर संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

दिल्लीत २०१२पासूनच गुटख्यावर बंदी आहे. मात्र त्या अधिसूचनेमध्ये केवळ या एकाच उत्पादनाचा उल्लेख असल्यामुळे अन्य प्रकारच्या तंबाखूची सर्रास विक्री सुरू होती. याला पायबंद घालण्यासाठी नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.