दुष्काळ

वीस हजार गावे दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 राज्यातही ६९ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार माध्यमातून पाच वर्षांत वीस हजार गावे दूष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तर महाराष्ट्राला महाउद्योग राष्ट्र करण्याचा मानसही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.

Aug 15, 2015, 01:26 PM IST

पवार दुष्काळ 'सहली'वर; सदाभाऊंची खरमरीत टीका

शरद पवार यांनी काढलेला दुष्काळ दौरा नसून ती दुष्काळ सहल आहे अशी खरमरीत टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुण्यामध्ये केली. 

Aug 14, 2015, 08:44 PM IST

टंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा, सरकारच्या सूचना

राज्यातल्या धरणांचा पाणीसाठी खालावत चालल्यामुळं टंचाई असलेल्या भागातलं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतालाय. यासंदर्भात राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

Aug 13, 2015, 07:28 PM IST

शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत

राज्यात बहुतांश ठिकाणी ५५ टक्के कमी पाऊस झाला आहे, पावसाची वाट पाहावी लागणार आहे, जर ३१ जुलैपर्यंत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत राज्य सरकार करेल, ही मदत एका शेतकऱ्याला जास्तच जास्त २ हेक्टरपर्यंत असेल.

Jul 20, 2015, 04:38 PM IST

पाऊस नसल्याने खान्देशात भीषण परिस्थिती

खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कसमादे पट्ट्यात ४० दिवसांपासून पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिकं पावसाअभावी वाळली आहेत, तर काही ठिकाणी वाढ खुंटली आहे.

Jul 20, 2015, 10:50 AM IST