दुष्काळ

दुष्काळाच्या झळा ; कोरड्या नदीतून मगर शेतात

जिल्ह्यातील काणेगाव शिवारात एक सहा ते सात फूट लांबीची मगर सापडली आहे, ही मगर नदीत किंवा एखाद्या तलावात नाही, तर चक्क शेतात सापडली आहे. दुष्काळामुळे माणसांचेही जीवन कठीण झालं आहे, मात्र मूके जलचरही नदी कोरडी पडल्याने, भक्ष्याच्या शोधात जमिनीवर येत आहेत.

Sep 9, 2015, 08:08 PM IST

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे या... नाहीतर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बॉलिवूडला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. मनसेनं बॉलिवूडला धमकीच दिलीय, जर ते पुढे आले नाही तर त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल.

Sep 9, 2015, 12:10 PM IST

दुष्काळाला शरद पवारच जबाबदार : काँग्रेस

दुष्काळावरून आता विरोधकांमध्येच जुंपण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच मराठवाड्यातील दुष्काळाला जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केलाय. 

Sep 8, 2015, 01:31 PM IST

घरात अन्नाचा एकही कण नाही म्हणून ५ मुलांच्या आईची आत्महत्या

राज्यात मराठवड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबी गावातील एका ४० वर्षीय महिलेनं ना रोजगार, ना घरात अन्नाचा कण... पाच मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्यानं तिनं रॉकेल ओतून स्वत: पेटवून घेतलं.

Sep 7, 2015, 03:58 PM IST

राज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका

बारामतीकरांमुळे राज्याच्या पाणी, वीज आणि ग्रामिण क्षेत्रातील प्रगतीचा खेळ खंडोबा झाला. तीन वेळा मुख्यमंत्री पद,कृषीखाते,पाटबंधारे अशी महत्वाची खाते असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही. 

Sep 7, 2015, 12:23 PM IST