दुष्काळ

पवार साहेब काय करताय हे बारामतीत?

जुलै संपत आला... अजूनही बारामती परिसरात पावसाची हजेरी नाही. दुष्काळाचं सावट आहे. पण याची जाण बारामतीतल्या जाणत्या राजांना आहे का? असा खरा प्रश्न आहे. माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उदघाटन सोहळ्यात लाखो रूपयांची अक्षरशः उधळपट्टी करण्यात येत आहे. शेतकरी पाण्यासाठी दाही दिशा फिरतोय इथं मात्र जेवणावळी रंगतायत.

Jul 15, 2014, 09:07 PM IST

राज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी!

एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे. 

Jul 10, 2014, 08:24 PM IST

उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती

उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे... एकीकडे राज्यात भीषण पाणीटंचाई आहे. मात्र उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यांमधून शेकडो एकर क्षेत्र भिजेल इतकं पाणी वाय़ा जातंय. गेल्या दोन तीन वर्षांपासून ही गळती सुरू आहे. पण निधीअभावी आणि राज्यकर्त्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या मोऱ्यांचं काम रखडलंय. 

Jul 9, 2014, 07:04 PM IST

पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती

पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात अजूनही खानदेशात पाऊस झालेला नाही. 

Jul 6, 2014, 10:10 AM IST